esakal | मोठी बातमी : ‘मॅग्मा फिनकॉर्प’ लवकरच पूनावालांकडे!
sakal

बोलून बातमी शोधा

adar_poonawala

‘मॅग्मा फिनकॉर्प’च्या या प्रेफरन्शियल ॲलॉटमेंटच्या माध्यमातून ३४५६ कोटी रुपयांची नव्याने भांडवली गुंतवणूक केली जाणार आहे.

मोठी बातमी : ‘मॅग्मा फिनकॉर्प’ लवकरच पूनावालांकडे!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : ‘मॅग्मा फिनकॉर्प लि.’ या आघाडीच्या बिगर-बँकिंग वित्त कंपनीतील (एनबीएफसी) नियंत्रणाएवढा मोठा हिस्सा (कंट्रोलिंग स्टेक) लवकरच आदर पूनावाला यांच्या नेतृत्वाखालील ‘रायझिंग सन होल्डिंग्ज’ या कंपनीच्या ताब्यात येणार आहे. वित्तीय क्षेत्रातील ही एक महत्त्वपूर्ण घडामोड मानली जात आहे.
आता ‘मॅग्मा फिनकॉर्प’ला पूनावालांकडून भक्कम पाठबळ मिळणार असून, त्यात मोठी भांडवली गुंतवणूकही केली जाणार आहे. याबाबतची घोषणा बुधवारी (ता.१०) करण्यात आली.

जय श्रीराम! अयोध्येत मंदिरासाठी 25 दिवसात जमा झालेत 1 हजार कोटी​

या इक्विटी प्रेफरन्शियल ॲलॉटमेंटनंतर ‘रायझिंग सन होल्डिंग्ज’ ही ‘मॅग्मा फिनकॉर्प’ची प्रवर्तक बनेल. या व्यवहाराला नियामकांची मान्यता मिळाल्यानंतर, ‘मॅग्मा फिनकॉर्प’ आणि तिच्या उपकंपन्यांचे ‘पूनावाला फायनान्स’ या ‘ब्रँडनेम’खाली नामकरण केले जाईल. तसेच ‘पूनावाला फायनान्स’च्या वित्तीय सेवा व्यवसायाचे नियमानुसार ‘मॅग्मा फिनकॉर्प’मध्ये एकत्रिकरण केले जाईल. या घडामोडीमुळे ‘मॅग्मा फिनकॉर्प’चा वित्तीय क्षेत्रात दबदबा वाढणार असून, कंपनीच्या पतमानांकनावर सकारात्मक परिणाम होण्याची शक्यता आहे.

सीता, रावणाच्या देशातील पेट्रोल-डिझेलचे दर रामाच्या भारतापेक्षा कमी कसे?, मोदी सरकारनं दिलं हे उत्तर

कंपनीचे समभागधारक आणि नियामकांच्या मान्यतेनंतर या व्यवहाराची पूर्तता होणार आहे. ‘मॅग्मा फिनकॉर्प’च्या या प्रेफरन्शियल ॲलॉटमेंटच्या माध्यमातून ३४५६ कोटी रुपयांची नव्याने भांडवली गुंतवणूक केली जाणार आहे. या व्यवहारानंतर ‘मॅग्मा फिनकॉर्प’ची नेटवर्थ ६३०० कोटी रुपयांपर्यंत वाढेल, असे सांगितले जाते.

‘रायझिंग सन होल्डिंग्ज’ने संचालक मंडळाचे अध्यक्ष म्हणून आदर पूनावाला यांचे, तर ‘पूनावाला फायनान्स’चे विद्यमान व्यवस्थापकीय संचालक (एमडी) आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीइओ) अभय भुतडा यांना व्यवस्थापकीय संचालक म्हणून नामांकीत केले आहे. पूनावाला यांची सध्याची बिगर-बँकिंग वित्तीय कंपनी ही भुतडा यांच्या नेतृत्वाखाली उत्तम कामगिरी करीत आहे. या व्यवहारानंतरची कंपनीदेखील त्यांच्याच नेतृत्वाखाली कार्यरत राहील. संजय चामरिया हे कार्यकारी उपाध्यक्ष म्हणून कायम राहतील. या व्यवहारानंतर ‘मॅग्मा फिनकॉर्प’ ही कंपनी कर्जवितरण क्षेत्रातील व्यापक संधींचा लाभ घेण्यासाठी सज्ज असेल.

'आंदोलनजिवी' हा शब्द म्हणजे हुतात्म्यांना दिलेली शिवी!

‘‘मॅग्मा फिनकॉर्पमधील ‘कंट्रोलिंग स्टेक’ घेण्याइतपत भांडवली गुंतवणूक करताना मला विशेष आनंद होत आहे. आपली अर्थव्यवस्था ‘डबल डिजिट’मध्ये प्रगती करण्याच्या टप्प्यात असताना वित्तीय क्षेत्रातील व्यवसायाला अमर्यादित वाव आहे. वैधानिक आणि नियामकांच्या मान्यतेनंतरच या व्यवहाराची पूर्तता होईल.’’ 
- अदर पूनावाला, संचालक, रायझिंग सन होल्डिंग्ज

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)