खेडमध्ये लॉकडाउन करण्याबाबत प्रशासनाने घेतली ही भूमिका

राजेंद्र सांडभोर
शनिवार, 4 जुलै 2020

लोकप्रतिनिधींनी लॉकडाउनचे आवाहन केल्याने व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवण्याची तयारी केली आहे. 

राजगुरुनगर (पुणे) : खेड तालुका लॉकडाउन करण्याबाबत प्रशासनाची धरसोड भूमिका असून, आज झालेल्या जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतरही ठोस निर्णय झाला नाही. 

पेट्रोल- डिझेलच्या दरावरून पुणेकरांना असाही दिलासा...

राजगुरूनगर, आळंदी व चाकणसह खेड तालुक्यातील कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सरकारने यासंदर्भात केलेल्या नियमांची कडक अंमलबजावणी करावी आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये वाढ करावी, असे निर्देश प्रशासनाला दिल्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले. दुसऱ्या बाजूस लोकप्रतिनिधींनी लॉकडाउनचे आवाहन केल्याने व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवण्याची तयारी केली आहे. 

कोंढापुरीत पर्यावराणासाठी झटताहेत ग्रामस्थ

खेड तालुक्यातील वाढत्या कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत जिल्हाधिकारी राम यांच्या अध्यक्षतेखाली राजगुरुनगर येथील कृषी उत्पन्न बाजार समिती सभागृहात बैठक झाली. या वेळी आमदार दिलीप मोहिते, सभापती अंकुश राक्षे, जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद आणि तालुक्यातील अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते. 

कोरोनाचा रिपोर्ट पाॅझिटिव्ह आल्याचे एेकूनच आला हार्ट अॅटॅक

लॉकडाउन शिथिल झाल्यानंतर लोकांनी काळजी घेणे सोडल्याने संसर्ग वाढला आहे. म्हणून नियमभंग करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. कंटेंन्मेंट झोनचे क्षेत्रफळ वाढविणार आहोत.  बाधित रुग्णांच्या संपर्कातील लोकांची शोध मोहिम राबविणार आहोत. भरारी पथके नेमणार आहोत. लग्नासारख्या सार्वजनिक कार्यक्रमात नियमभंग झाल्यास कारवाई करणार आहे. खासगी रुग्णालयांनी रुग्णाला दाखल करुन घेण्यास टाळाटाळ केल्यास कारवाई करणार, असे जिल्हाधिकारी राम यांनी सांगितले. 

खेड तालुक्यात कोरोना संकटाशी मुकाबला करण्यासाठी मूलभूत सुविधा चांगल्या उपलब्ध आहेत. मात्र, नियोजनाचा अभाव आहे. चांगले नियोजन केले, तर तालुका कोरोनावर मात करू शकतो, असे मत राम यांनी व्यक्त केले. तसेच, पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी, अत्यावश्यक सेवा व इतर महत्वाच्या कामाशिवाय अनावश्यक गर्दी करणाऱ्या नागरिकांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The administration has not decided to lockdown in Khed