कंटेन्मेंट झोनमध्ये नवे भाडेकरू, घरेलू कामगारांना बंदी; प्रशासनाचा निर्णय

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 जुलै 2020

जारी केलेल्या आदेशातील मुद्दे

  • ६५ वर्षांवरील व्यक्ती, आजारी व्यक्ती, गरोदर महिला, लहान मुले यांना अत्यावश्‍यक सेवा व वैद्यकीय कारणांशिवाय घराबाहेर जाता येणार नाही.
  • प्रतिबंधित क्षेत्रात सकाळी १० ते दुपारी २ या कालावधीतच दूध, भाजीपाला, फळे व इतर अत्यावश्‍यक सुविधा सुरू 
  • गृहनिर्माण सोसायटीमध्ये रुग्ण आढळल्यास मायक्रो कंटेन्मेंट झोन २८ दिवसांच्या कालावधीसाठी त्या सोसायटीपुरताच मर्यादित राहील.

पुणे - प्रतिबंधित क्षेत्र (कंटेन्मेंट झोन) आणि नॉन कंटेन्मेंट झोनमधील नियमावलीच्या संभ्रमातून काही गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये सभासद आणि पदाधिकाऱ्यांमध्ये वाद होत आहेत. कंटेन्मेंट झोनमध्ये अत्यावश्‍यक सेवा वगळता नवीन भाडेकरू, घरकाम करणाऱ्या किंवा इतर व्यक्तींना बंदी असेल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

महापालिका, ग्रामपंचायतीच्या प्रतिबंधित क्षेत्रात वैद्यकीय, आपत्कालीन सेवा, औषध विक्रीचे दुकाने आणि जीवनावश्‍यक वस्तूंचा पुरवठा वगळता अन्य व्यक्तींना प्रतिबंधित क्षेत्र (कंटेन्मेंट झोन) मध्ये प्रवेश करण्यास किंवा परिसरातून बाहेर पडण्यास बंदी आहे.

आपल्या पाल्याच्या करिअरविषयी योग्य मार्गदर्शन; करिअर निवडीची हीच सुवर्णसंधी

घरकाम करणाऱ्या व्यक्ती प्रतिबंधित क्षेत्राच्या बाहेर राहणाऱ्या कोणत्याही व्यक्तीच्या घरी, घर मालकाची इच्छा असल्यास स्वेच्छेने काम करता येईल. परंतु प्रतिबंधित क्षेत्रात राहणाऱ्या व्यक्तींना प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील ठिकाणी घरकाम करण्यास परवानगी नाही.

प्रतिबंधित क्षेत्रामध्ये दूध, भाजीपाला, अत्यावश्‍यक सेवा देणारी वाहने पाण्याचे टॅंकर, रुग्णवाहिका, शववाहिका, अग्निशामक दलाचे वाहन, कचरा वाहतूक गाडी, त्यावरील कर्मचाऱ्यांना प्रतिबंधित क्षेत्रामध्ये प्रवेश करता येईल, अशी माहिती प्रशासनामार्फत देण्यात आली.

ज्येष्ठांनो, अशी घ्या काळजी....

मदतनिसाला परवानगी पण...
ज्येष्ठ नागरिकांना, रुग्णसेवेसाठी मदतनीस व्यक्ती, घरकाम करणारी व्यक्ती, वाहनचालक यांची मदत घेता येईल. तथापि, मदत करणारी व्यक्ती प्रतिबंधित क्षेत्राच्या बाहेरील असावी.

पुणे जिल्ह्यातील (ग्रामीण) एकूण कंटेन्मेंट झोन  ३१६
१८३ - पूर्ण झालेले कंटेन्मेंट झोन
१३३ - क्रियाशील कंटेन्मेंट झोन

पुण्यातील डॉ. नायडू रुग्णालयाची १२० वर्षांची वाटचाल

प्रतिबंधित क्षेत्र जाहीर केल्यानंतर २८ दिवसांच्या कालावधीत संबंधित गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये अत्यावश्‍यक वस्तूंचा पुरवठा आणि सेवा पुरविणारे कर्मचारी वगळता इतर व्यक्तीला बाहेर जाण्यास किंवा सोसायटीमध्ये येण्यास परवानगी नाही. घरकाम करणाऱ्या व्यक्ती, नवीन भाडेकरू आणि गाड्या धुणाऱ्या व्यक्तींना प्रतिबंधित क्षेत्रात परवानगी नाही. 
- सचिन बारवकर, उपविभागीय अधिकारी, हवेली


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Administrations decision to ban new tenant domestic workers in the containment zone