Lockdown 4 : निर्बंध शिथील होताच पुण्यात भांडणे, मारहाणीच्या घटना वाढल्या!

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 मे 2020

कोंढव्यातील टिळेकरनगर परिसरात दुचाकीस्वार तरुणावर पूर्वीच्या वादातून धारदार शस्त्राने वार करण्यात आल्याची घटना घडली.

पुणे : कोरोनामुळे पोलिसांकडून शहरात लागू करण्यात आलेले निर्बंध काही प्रमाणात शिथील झालेले असल्यामुळे आता किरकोळ भांडणे, मारहाणीच्या घटना वाढण्यास सुरुवात झाली आहे. लहान मुलांची भांडणे सोडविणाऱ्या एका तरुणावर दोन व्यक्तींनी धारदार शस्त्राने वार केल्याची हडपसरमधील सय्यदनगरमध्ये घडली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

अल्ताफ मुलाणी (वय १९, रा.सय्यदनगर, हडपसर) असे या घटनेत जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी नासीर शेख, तालिम खान (दोघे रा. सय्यदनगर, हडपसर) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. मुलाणीने वानवडी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, दोन दिवसांपूर्वी रात्री नऊच्या सुमारास सय्यदनगरमध्ये लहान मुलांची भांडणे सुरू होती.

- पुणेकरांना जबर धक्का : दिवसभरातील रुग्णसंख्या पोहोचली तीनशेपर्यंत!

तेथे थांबलेल्या फिर्यादी अल्ताफ मुलाणीने लहान मुलांची भांडणे सोडवली. त्यानंतर एक मुलगा रडत घरी गेला. मुलाणीने मला मारहाण केली, असे त्याने त्याच्या कुटुंबीयांना सांगितले. त्यानंतर शेख व खान तेथे आले. त्यानी मुलाणी व त्याचा मित्र अल्ताफ हनीफ सैय्यद यांना शिवीगाळ केली. शेख व खानने मुलाणीच्या डोक्यात कोयत्याने वार केला. त्याला बेदम मारहाण केली.

- महत्त्वाची बातमी : रेशन कार्ड नसले तरी मिळणार ५ किलो तांदूळ, तोही मोफत

दरम्यान, कोंढव्यातील टिळेकरनगर परिसरात दुचाकीस्वार तरुणावर पूर्वीच्या वादातून धारदार शस्त्राने वार करण्यात आल्याची घटना घडली. याप्रकरणी रोहन कामठे (वय २३, रा. टिळेकरनगर, कोंढवा बुद्रुक) यानी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

- Fight With Corona : पुणे विभागासाठी बनवलं खास साॅफ्टवेअर; काय करणार हे सॉफ्टवेअर?

दुचाकीस्वार कामठे व त्याचा मित्र अक्षय आवारे टिळेकरनगर परिसरातून दोन दिवसांपूर्वी सायंकाळी निघाले होते. त्यावेळी दुचाकीववरून आलेल्या चौघा हल्लेखोरांनी कामठेला शिवीगाळ केली. त्याच्यावर कोयत्याने वार केले. पोलीस उपनिरीक्षक चव्हाण तपास करत आहेत.

- पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: After removal some restrictions led to an increase in crime in Pune city