Fight With Corona : पुणे विभागासाठी बनवलं खास साॅफ्टवेअर; काय करणार हे सॉफ्टवेअर?

सकाळ वृत्तसेवा
Friday, 22 May 2020

विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांच्या मार्गदर्शनाखाली शैलेंद्र पाठक यांनी हे सॉफ्टवेअर विकसित केले आहे.

पुणे : पुणे विभागातील पुणे, सांगली, सातारा, सोलापूर आणि कोल्हापूर या पाच जिल्ह्यातील कोरोना रुग्णांवर विविध हॉस्पिटलमध्ये उपचार केले जात आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

या हॉस्पिटलचे व्यवस्थापन, रुग्णवाहिका व्यवस्थापन तसेच इतर वैद्यकीय सुविधांचे व्यवस्थापन आणि इतर आवश्यक माहिती अद्ययावत ठेवण्यासाठी एक खास सॉफ्टवेअर तयार करण्यात आले आहे. या 'कोविड केअर सॉप्टवेअर'चा शुभारंभ शुक्रवारी (ता.२२) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते  करण्यात आला.

- कोरोना संबंधातील 10 महत्त्वाच्या बातम्या; वाचा एका क्लिकवर

या सॉफ्टवेअरच्या मदतीने पुणे विभागातील कोरोना रुग्ण, उपचार, हॉस्पिटल व्यवस्था, रुग्णवाहिका व्यवस्था, रुग्ण असलेली क्षेत्रे याबाबत माहिती संकलन करणे सुलभ होणार आहे. विधान भवनच्या 'झुंबर हॉल'मध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली 'कोरोना' संसर्ग प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अनुषंगाने अधिकाऱ्यांची आढावा बैठक पार पडली. या बैठकीत या या सॉफ्टवेअरचे प्रकाशन करण्यात आले.

- पुणेकरांना जबर धक्का : दिवसभरातील रुग्णसंख्या पोहोचली तीनशेपर्यंत!

यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, जमाबंदी आयुक्त एस.चोक्कलिंगम, पुणे पोलिस आयुक्त के.व्यंकटेशम, पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्त संदिप विष्णोई, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पुणे मनपा आयुक्त शेखर गायकवाड, पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त श्रावण हार्डिकर, सहकार आयुक्त अनिल कवडे, साखर आयुक्त सौरभ राव, पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंग, भूजल सर्व्हेक्षण संचालक कौस्तुभ दिवेगावकर, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, शांतनू गोयल, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, ससूनचे अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे, आरोग्य विभागाचे निवृत्त महासंचालक डॉ. सुभाष साळुंखे, आदींसह  विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.  

- मुंबई-पुण्यात मास्क अन् सॅनिटायझरचा मोठा काळाबाजार; 41 लाख मास्क पोलिसांनी केले जप्त!

विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांच्या मार्गदर्शनाखाली शैलेंद्र पाठक यांनी हे सॉफ्टवेअर विकसित केले आहे. या सॉफ्टवेअरबाबत विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर आणि पाठक यांनी सविस्तर माहिती दिली.

- महत्त्वाची बातमी : रेशन कार्ड नसले तरी मिळणार ५ किलो तांदूळ, तोही मोफत

- पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Covid Care Software was launched by Deputy CM Ajit Pawar on Friday 22nd May 2020