वाघोली महावितरण कार्यालयासमोर केसनंदच्या शेतकऱ्यांचे ठिय्या आंदोलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

agitation of Kesanand farmers in front of Wagholi MSEDCL office
वाघोली महावितरण कार्यालयासमोर केसनंदच्या शेतकऱ्यांचे ठिय्या आंदोलन

वाघोली महावितरण कार्यालयासमोर केसनंदच्या शेतकऱ्यांचे ठिय्या आंदोलन

वाघोली : केसनंद परिसरातील शेतकऱ्यांचे (Farmers) वीज जोड बंद केल्याने वाघोली येथील महावितरण (MSEDCL) कार्यालयासमोर शेतकरी संघटना (Farmers Association) व केसनंद ग्रामस्थांच्या वतीने ठिय्या आंदोलन (Agitation) करण्यात आले. या आंदोलनाची महावितरणने दखल घेत वीज जोड जोडून पुन्हा वीज पुरवठा (Power supply) सुरु केला.

हेही वाचा: ..तर केंद्राच्या नियमानुसार लॉकडाऊन लावावं लागेल! - पेडणेकर

वीज बिल न भरल्याने महावितरणने शेतकऱ्यांची वीज तोडण्याची मोहीम हाती घेतली आहे. वीज तोडल्यामुळे शेतकऱ्यांना पिकांना पाणी देता येत नाही. त्यामुळे पीक धोक्यात येते. असे असतानाही महावितरण धडाधड वीज जोड तोडत आहे. सध्या अवेळी पाऊस व अन्य बाबी पिकांचे नुकसान होऊन शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे. केसनंद परिसरातील वीज जोड तोडल्याने शेतकऱ्यांनी वाघोली महावितरण कार्यालयासमोर आंदोलन करण्याची भूमिका घेतली.

सकाळ पासूनच आंदोलनाला सुरुवात केल्यानंतर सामाजिक संघटना व केसनंद ग्रामपंचायतीने आंदोलनाला पाठींबा दिला. महावितरण कंपनीने शेतकऱ्यांचे वीज जोड बेकायदेशीर तोडल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. बाबासाहेब हरगुडे, नारायण हरगुडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. महावितरणच्या वरिष्ठ अधिकारी यांनी आंदोलनाची दखल घेऊन वीज जोड पुन्हा सुरु करण्याबाबत सूचना केल्या.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top