esakal | बारामतीकरांसाठी दिलासादायक बातमी; लॉकडाउनचे नियम प्रशासनाने केले शिथिल!
sakal

बोलून बातमी शोधा

baramati

कामावर लवकर जाणारे आणि पाचनंतर परतणाऱ्यांची मोठी गैरसोय होत होती. याचा विचार करुन हा निर्णय घेतला गेला.

बारामतीकरांसाठी दिलासादायक बातमी; लॉकडाउनचे नियम प्रशासनाने केले शिथिल!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बारामती (पुणे) : शहरातील कोरोनासंदर्भातील परिस्थिती सुधारली असल्याने प्रशासनाने सोमवार (ता.22) पासून अधिक शिथीलता देण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारपासून बारामतीतील सर्व दुकाने सकाळी 9 ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत.

- उपअधीक्षक झालेला प्रविण सांगतोय 'एमपीएससी'चा 'सक्सेस मंत्र'!

गेल्या अनेक दिवसांपासून बारामती शहरातील व्यवहार पूर्ववत व्हावेत, अशी व्यापाऱ्यांची मागणी होती. त्याचा विचार करून प्रशासनाने दोन तास आणखी दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी दिली असल्याची माहिती बारामती व्यापारी महासंघाचे अध्यक्ष नरेंद्र गुजराथी यांनी दिली.

- बनावट प्रवासी पास तयार करून त्याची विक्री करायचा फोटोग्राफर; मग...

बारामतीतील आमराई परिसरातील एका महिलेला कोरोनाची बाधा झाल्याची घटना समोर आल्यानंतरही शहरातील परिस्थिती तुलनात्मक उत्तम असल्याने प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. या महिलेव्यतिरिक्त बारामतीत कोरोनाचा एकही रुग्ण नाही. त्यामुळे व्यापाऱ्यांचे होणारे नुकसान टाळण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. इतक्या दिवस संध्याकाळी पाच वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली होती.

- उपमुख्यमंत्र्यांनी जळगाव सुपेला दिली भेट अन्...

मात्र कामावर लवकर जाणारे आणि पाचनंतर परतणाऱ्यांची मोठी गैरसोय होत होती. याचा विचार करुन हा निर्णय घेतला गेला.
व्यापाऱ्यांच्या मागणीचा विचार करुन हा निर्णय झाला ही बाब बारामतीच्या व्यापाऱ्यांसाठी आनंददायी आहे, असे नरेंद्र गुजराथी, सुशील सोमाणी यांनी सांगितले.

- एकाच नंबरची प्लेट वापरली दोन वाहनांना अन्...

हॉटेल, लॉज, जिमही सुरु करा...
सर्वांना परवानगी दिलेली असताना हॉटेल, लॉज, जिम, सलून व्यावसायिकांना मात्र अद्यापही दिलासा मिळालेला नाही. आता इतर सर्व बाबी सुरु झालेल्या असताना या व्यावसायिकांना बारामतीत व्यवसाय सुरू करण्याची परवानगी दिली पाहिजे, अशी या व्यावसायिकांची मागणी आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

loading image
go to top