Agriculture Course Time Table : कृषी अभ्यासक्रमाचे प्रवेश वेळापत्रक जाहीर

कृषी अभ्यासक्रमांसाठी राज्यात एकूण १२ हजार ६९० जागांवर प्रवेश देण्यात येणार आहे. पात्र विद्यार्थ्यांना ९ जुलै पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.
Agriculture Course Time Table
Agriculture Course Time Tablesakal

Agriculture Course Time Table - अभियांत्रिकीनंतर आता कृषी अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया राज्य सामायिक प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. राज्यातील कृषी विद्यापीठासह संलग्न महाविद्यालयांमधील नऊ पदवी अभ्यासक्रमांसाठीची प्रवेश प्रक्रिया आहे. प्रवेशासाठी राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

Agriculture Course Time Table
Mumbai Rain: मुख्यमंत्री महोदय…. कोणी गाडीच्या टपावर..तर कोणी गाडीला ठेवले बांधून..मुंबईमध्ये पावसाचा हाहाकार Video Viral

कृषी अभ्यासक्रमांसाठी राज्यात एकूण १२ हजार ६९० जागांवर प्रवेश देण्यात येणार आहे. पात्र विद्यार्थ्यांना ९ जुलै पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. राज्यातील कृषी विद्यापीठांमधील बी.एस्सी. (ऑनर्स) (कृषी), बी.एस्सी. (ऑनर्स) (उद्यानविद्या), बी.एस्सी. (ऑनर्स) (सामुदायिक विज्ञान), बी.एस्सी. (ऑनर्स) (वनविद्या), बी. एफ्.एस्सी. (मत्स्यविज्ञान), बी. टेक. (कृषी अभियांत्रिकी), बी. टेक. (अन्नतंत्रज्ञान), बी. टेक. (जैवतंत्रज्ञान) आणि बी. एस्सी. (ऑनर्स) (कृषी व्यवसाय व्यवस्थापन) या व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांच्या पहिल्या वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे.

पदवी प्रवेशासाठी किमान पात्रता -

- केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेसाठी प्रवेश अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत उमेदवाराचे वय किमान १६ वर्षे असावे.

- पात्रता परीक्षेमध्ये (इयत्ता १२ वी विज्ञान) खुल्या गटातील उमेदवारास ५० टक्क्यांपेक्षा कमी आणि आरक्षित प्रवर्गाच्या उमेदवारास ४० टक्क्यांपेक्षा कमी गुण नसावे. याचबरोबर सामायिक प्रवेश परीक्षेमध्ये विद्यार्थ्याना किमान गुण शुन्य पेक्षा जास्त असावेत.

प्रवेशासाठी संकेतस्थळ -

https://ug.agriadmissions.in/Downloads/2023-24/Prospectus%20Marathi.pdf

Agriculture Course Time Table
Educational Policy : शिक्षणाचा हक्क कायद्यात सुधारणा! आता पाचवी, आठवीला वार्षिक परीक्षा

प्रवेश प्रक्रिया वेळापत्रक

- ऑनलाईन अर्जासाठी अंतिम मुदत – ९ जुलै

- तात्पुरती गुणवत्ता यादी – १३ जुलै

- हरकती सूचना – १४ ते १६ जुलै

- अंतिम गुणवत्ता यादी – २० जुलै

- पहिल्या फेरीची निवड यादी – २२ जुलै

- महाविद्यालयांमध्ये प्रवेश घणे – २३ ते २५ जुलै

- महाविद्यालय व प्रर्गनिहाय कटऑफ – २६ जुलै

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com