पुरंदर विमानतळाच्या जागेत बदल होणार की नाही? वाचा विभागीय आयुक्त काय म्हणाले

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 15 October 2020

भूसंपादनाचे पॅकेज अंतिम करताना शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही, त्यांना योग्य तो मोबदला मिळाला पाहिजे, याबाबींना प्राधान्य देण्याच्या सूचना पवार यांनी दिल्या आहेत.

पुणे : 'प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळ हे पुरंदर तालुक्‍यातच होणार आहे,' असे ठामपणे सांगत, मात्र भूसंपादन, कनेक्टिव्हीटी, पाणी, वीजसह आदी विमानतळासाठी आवश्‍यक त्या गोष्टी सोयीस्कर व्हाव्यात, यासाठी पुन्हा निश्‍चित केलेल्या जागेबरोबरच अन्य चार जागांची संरक्षण विभाग, एअरपोर्ट ऍथॉरिटी ऑफ इंडिया आणि हवाई दल यांनी संयुक्तपणे पाहणी करण्यात येणार आहे. त्या पाहणीचा अहवाल तीन आठवड्यात शासनाला सादर केला जाणार आहे, असे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी बुधवारी (ता.१४) सांगितले. त्यामुळे विमानतळाच्या जागेत बदल होणार असे नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

Pune Rain Live Updates : पुण्यात पावसाने दैना, घरांमध्ये शिरले पाणी; सिंहगड रोड बंद

पुरंदर विमानळाचा कामकाजाचा आढावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी घेतला. बैठकीमध्ये अन्य चार पर्यायी जागांचा पुन्हा एकदा पाहणी करावी, अशी सूचना पवार यांनी केली होती. त्यामुळे विमानतळाच्या जागेबाबत उलट-सुलट चर्चा झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर राव विचारले यावेळी ते म्हणाले," विमानतळासाठी पुरंदर तालुक्‍यातील पाच जागांची पाहणी करून क्रमांक एकची जागा विमानतळासाठी निश्‍चित करण्यात आली. या जागेला सर्व प्रमुख विभागांची मान्यता मिळालेली आहे. संरक्षण विभाग आणि हवाई दल यांनीसुध्दा या जागेला मान्यता दिलेली आहे.

Breaking : कोरोना सर्व्हेचं काम स्थगित; मुसळधार पावसामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला निर्णय!​

तसेच सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले आहे. भूसंपादन सुरू करण्यापूर्वी निश्‍चित करण्यात आलेल्या जागेसह अन्य पर्याय जागेंची पुन्हा एकदा हवाई दल आणि संरक्षण विभागांकडून तपासणी करून घ्यावी. जेणेकरून भूसंपादन करणे सोपे होईल हा देखील त्यामागे उद्देश आहे. तसेच भूसंपादन सुरू करण्यापूर्वी प्रशासनाने मोबदल्यासंदर्भात जे चार पर्याय सुचविले आहेत. त्या पर्यायांचा फेरआढावा घेण्यात यावा, अशा सूचना उपमुख्यमंत्री पवार यांनी दिल्या आहेत. त्यानुसार पुन्हा उर्वरित चार जागांची पाहणी केली जाणार आहे.''

Pune Rain : खडकवासला धरण क्षेत्रात मुसळधार; मुठा नदीकाठच्यांना सतर्कतेचा इशारा!

भूसंपादनाचे पॅकेज अंतिम करताना शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही, त्यांना योग्य तो मोबदला मिळाला पाहिजे, याबाबींना प्राधान्य देण्याच्या सूचना पवार यांनी दिल्या आहेत. त्यानुसार मोबदल्यांच्या सर्व पर्यायांचा विचार करण्यात येणार आहे. यामध्ये नवी मुंबई विमानतळ उभारताना दिलेले पॅकेज तसेच समृध्दी कॉरिडॉरसाठी देण्यात आलेले पॅकेज या पॅकेजसुध्दा अभ्यास करून शेतकऱ्यांना आकर्षक पॅकेज दिले जाणार आहे, असेही राव यांनी सांगितले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: airport will be in Purandar taluka itself said Divisional Commissioner Sourabh Rao