अजित पवारांमागे माझा हात नाही : शरद पवार

Ajit Pawar rebellion is their personal decision said Sharad pawar
Ajit Pawar rebellion is their personal decision said Sharad pawar

कऱ्हाड : अजित पवारांचे बंड हा पक्षाचा निर्णय नाही. हा त्यांचा वैयक्तीक निर्णय आहे. अजित पवारांनी जे केले त्यापाठीमागे माझा हात असता तर, मी माझ्या सर्व सहकाऱ्यांना सांगितले असते. माझ्या सहकाऱ्यांशी एखाद्या प्रश्नावर सविस्तर चर्चा करुन ते त्यांना पटवून दिले तर ते माझ्या सुचनेचा अनादर करतात असा माझा अनुभव नाही. त्यामुळे त्या पाठीमागे माझा हात आहे असे म्हणने बरोबर नाही, अशी स्पष्टोक्ती माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज येथे केली.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

यशवंतराव चव्हाण यांच्या समाधिस्थळी अभिवादन केल्यानंतर ते बोलत होते. ''अजित पवारांचे बंड हा पक्षाचा निर्णय नाही. त्यामध्ये आम्ही सहभागी नाही,''असे सांगून पवार म्हणाले, ''राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकीत अगोदर तीन पक्षांचे मिळुन सरकार बनवायची चर्चा झाली.  त्यानंतर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या सामुहिक दोन बैठका झाल्या. त्या बैठकीला अजित पवारांसह राष्ट्रवादीचे नेते उपस्थित होते. दोन्ही बैठकीत तिघांनी सरकार बनवायचे यात एकवाक्यता झाली. मात्र त्यानंतर त्यांच्यात बदल झाला हा त्यांचा वैयक्तीक निर्णय आहे. अजित पवारांचे बंड हा पक्षाचा निर्णय नाही. त्यांच्या पाठीमागे माझा हात असता तर, मी माझ्या सर्व सहकाऱ्यांना सांगितले असते. माझा हात आहे असे म्हणने बरोबर नाही.

भाजपचा डाव उधळून लावण्याची तयारी 

बैठकांतील चर्चा लांबुन भाजपला वेळ मिळाल्याने त्यांनी सरकार स्थापन्याची संधी साधली या प्रश्नावर पवार म्हणाले, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एका विचाराचे आहोत. मात्र शिवसेना वेगळ्या विचाराची आहे. पाच वर्ष सरकार चालवायचे आहे. त्यामुळे किमान मान्यता असलेला कार्यक्रम घेऊन सरकार चालवले तर ते टिकते. तीन पक्ष एकत्र येतात त्यावेळी राज्यातील जनतेच्या हिताचा विचार करुन राज्य चालवायचे या निष्कर्षापर्यंत आम्ही आलो आहोत. कुणीतरी सांगितले आम्ही राज्यातील शेतकऱ्यांचे सर्व कर्ज माफ करु. मात्र ते कोणते, कसे माफ करायचे याचा विचार करावा लागतो. निवडणुकावेळी बोलणे आणि राज्य चालवण्यासाठी बसल्यावर निर्णय घेणे यामध्ये फरक आहे. त्याचा निर्णय घ्यायला वेळ लागतो. त्यामुळे निर्णय लांबल्याने भाजपला संधी मिळाली असे म्हणने चुकीचे आहे. 

उपमुख्यमंत्रिपद नाकारल्याने अजित पवारांचे बंड 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com