Ajit Pawar: "तर मी टोकाचा निर्णय घेईन, माझ्या प्रपंचाला लागेन, शेती करेन.." अजित पवारांची लोकसभा निवडणूकीबाबत निर्णायक भूमिका

बारामतीचा विकास बघून मतदान करण्याचे आवाहन
Ajit pawar
Ajit pawarsakal

आगामी लोकसभा निवडणूकीत एनडीऐला बहुमत मिळविण्यासाठी जनतेचा वाढता पाठींबा आहे. भारताचे पंतप्रधान पुन्हा मोदीसाहेबांना करण्यासाठी भाजपासह सर्व घटक पक्षाचे एकमत झाले आहे.

त्यामध्ये महाराष्ट्रात राष्ट्रवादी काॅग्रेस पाटीचाही मोठा हातभार लागणार आहे. त्या पार्श्वभूमिवर जागा वाटपाचे धोरण लवकरच निश्चित होईल, त्यानंतरच  बारामती लोकसभा मतदार संघात आमचा उमेदवार जाहीर होईल. उमेदवार हा अजित पवारच आहे, अशी खुनगाठ बांधून पदाधिकारी व कार्य़कर्त्यांनो जोमाने कामाला लागा, बारामतीचा विकास बघून मतदान करा, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीत केले.

Ajit pawar
Ajit Pawar On Supriya Sule : संसदपटूंनी भाषणं करून प्रश्न सुटत नाहीत; अजित पवारांचा सुप्रिया सुळेंना टोला?

बारामती लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमिवर आज बारामतीमध्ये आयोजित केलेल्या बूथ कमिटी कार्यकर्ता मेळाव्यात राष्ट्रवादी काॅग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते.

यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हा प्रमुख प्रदिप गारटकर, ज्येष्ठ नेते विश्वनाथ गावडे, बाळासाहेब तावरे, केशवराव जगताप, पुरूषोत्तम जगताप, शहाजी काकडे, तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, शहराध्यक्ष जय पाटील, सचिन सातव आदी पदाधिकारी, कार्य़कर्ते  मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकसभा अथवा विधान सभेची निवडणूक आपल्याला नविन नाहीत. परंतु यंदाच्या निवडणूकीत घड्याळ चिन्ह तेच...पण वेळ मात्र बदलली आहे, असे सांगून अजित पवार म्हणाले,`` देशाच्या लोकशाहीमध्ये बहुमताला महत्व आहे. राष्ट्रवादी पक्ष कोणाचा हे निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्षांनी बहुमताचा विचार करून ठरविले आहे. त्यामध्ये आम्ही पक्ष चोरला आणि पळविला हे म्हणणे चुकीचे आहे.

Ajit pawar
Sharad Pawar vs Ajit Pawar: Rahul Narvekar यांचा निकाल काय सांगतो? | NCP MLA Disqualification

वास्तविक हे चित्र पुढे येऊ नये, म्हणून वरिष्टांना सातत्याने ६० पेक्षा अधिक आमदारांचा सांगण्याचा प्रयत्न होता. परंतु ऐनवेळी त्यांनी भूमिका बदलली. शेवटी मी व सुनिल तटकरे, भुजबळसाहेब आदी ५२ पेक्षा अधिक आमदारांनी निर्णय घेतला आणि भाजप-शिवसेना (शिंदेगट) सरकारमध्ये गेलो. विरोधात फक्त भाषण करता येतात, मोर्चे व आंदोलने करतात येतात. जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी आणि आपल्या भागातील विकासाची घौडदौड सुरू ठेवण्यासाठी सत्तेत राहवे लागते.

सत्तेत गेल्यानंतर बारामतीसह पुणे जिल्ह्यातील पाणी, रस्ते, दिवाबत्ती, आरोग्य आणि शिक्षणासारख्या मुलभूत समस्या सोडविण्यासाठी कोठ्यावधी रुपये मंजूर करून आले. काही कामावरील स्थगित्या उठविल्या. शेतीला उन्हाळ्यात पाणी सोडले. ``  दुसरीकडे, भाजपचे माजी तालुकाध्यक्ष प्रविण आटोळे व त्यांचे कार्य़कर्ते, वंचित बहुजन आघाडीच्या अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी पक्ष प्रवेश केला.

Ajit pawar
Ajit Pawar in Pune: 'कुणाचे फोन आले तरी हळवे होऊ नका'; अजित पवारांचे कार्यकर्त्यांना आवाहन

पार्लमेंटमध्ये भाषण करून प्रश्न सुटत नाहीत...

``बारामती लोकसभा मतदार संघात आमचे वरिष्ठ भावनिक करतील. भावनिक होऊन प्रश्न सुटत नाहीत. प्रश्न आणि लोकांच्या गरजा पुर्णत्वाला आणण्याची माझ्यामध्ये धमक आहे. काहींना वाटते की पार्लमेंटमध्ये भाषणे केली आणि संसदपट्टू म्हणून किताब मिळविला म्हणजे सर्वकाही केले असे नाही. रात्रंदिवस काम कराव लागते. त्यांनी केवळ भाषण आणि सेल्फी काढण्यात वेळ घालविला. माझा उमेदावर मात्र नवखा असला तरी मी जुनाच आहे. त्यामुळे अजित पवार यांच्याकडे बघून मतदान कराचे. जर मला राज्यात आणि देशात कमीपणा आला तर मी टोकाचा निर्णय घेईल. माझ्या प्रपंचाला लागलेल. शेती करणे, `` अशा शब्दात अजित पवार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांचे नाव न घेता टिका केली.

मला एकटे पाडण्याचा प्रयत्न होईल...

यंदाची लोकसभा निवडणूक माझ्या कुटुंबियांच्या दृष्टीने आव्हानात्मक आहे. मी व माझे कुटुंब वेगळे आणि कदाचित पवार कुटुंबियांमधील इतर लोक माझ्या विरोधात प्रचाराला उतण्याची शक्यता आहे. मी त्यांना विनंती करणार आहे, परंतु कोणत्याही परिस्थितीत ही निवडणूक विकास कामांच्या मुद्यांवर मी जिंकण्याचा निर्धार केला आहे. त्याला तुम्ही साथ द्या, असे अजित पवार यांनी भावनिक आवाहन केले. या प्रसंगी उपस्थितांनी अजितदादा आगे बडो...हम तुमारे साथ है...अशा शब्दात  घोषणा देत त्यांच्या भूमिकेला पाटींबा दिला.

.

Ajit pawar
Ajit Pawar: अजित पवार अल्पसंख्यांक नेत्याला देणार राज्यसभेची खासदारकी? निवडणुकीसाठी या नेत्यांमध्ये मोठी शर्यत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com