भामा आसखेड जलवाहिनी कामाबाबत अजितदादा म्हणतात...  

ajit pavar- khed.
ajit pavar- khed.

आंबेठाण : भामा आसखेड जलवाहिनीचे काम मी सुरू केले नाही, तर ते मागच्या सरकारने सुरू केले आहे. पोलिस बंदोबस्तात काम सुरू आहे, असे माझ्या कानावर आले आहे. याबाबत १२ तारखेला जिल्हाधिकारी मिटिंग घेतील, त्याअगोदर आमदार, खासदार यांची मिटिंग घेतो, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.  

खेड तालुक्यात वादळात घराचे नुकसान होऊन मृत्युमुखी पडलेल्या नवले कुटुंबाची भेट घेऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार वहागाव येथे आले होते. त्यावेळी भामा आसखेड प्रकल्पग्रस्त आंदोलकांनी पवार यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले आणि चर्चा केली. त्यावर अजित पवार यांनी बैठक घेण्याबाबत आश्वासन दिले. खासदार अमोल कोल्हे, आमदार दिलीप मोहिते पाटील, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, प्रांताधिकारी संजय तेली, तहसीलदार सुचित्रा आमले या वेळी उपस्थित होते.
     

आम्हाला पोटापुरते पाणी राखीव ठेऊन पात्र खातेदारांना जमिनीला जमीन आणि अपात्र खातेदारांना पॅकेज द्यावे, अशी आमची पूर्वीपासूनची मागणी आहे. त्यावर आम्ही आजही ठाम आहोत, पण सरकारकडून लेखी आश्वासन देऊनसुद्धा आमची फसवणूक केली जात असून, पोलिस बळाचा वापर केला जात आहे. हा आमच्यावर अन्याय असून, तो आम्ही सहन करणार नाही. उलट मागण्या मान्य होत नाही, तोपर्यंत सुरू केलेले जलवाहिनीचे काम बंद करणार असून, आंदोलन उभारणार आहे, असा ठाम निर्धार भामा आसखेड प्रकल्पग्रस्त नागरिकांनी आज व्यक्त केला.


या वेळी देविदास बांदल म्हणाले की, खातेदार जास्त आणि जमीन कमी म्हणून काहीतरी मार्ग काढावा म्हणून आम्ही अपात्र शेतकऱ्यांसाठी पॅकेजचा मार्ग स्वीकारला होता. तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी लेखी दिल्यानुसार पुनर्वसन होत नाही, तोपर्यंत पुणे महानगरपालिकेने सुचविलेल्या १ किलोमीटर अंतरातील जलवाहिनीचे काम थांबविण्यात येईल, असे ठरले होते. जिल्हाधिकारी यांच्या त्या लेखी आश्वासनाचे काय झाले? लेखी आश्वासन कोणी दिले, हे पाहून जलवाहिनीचे काम थांबवावे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com