अजितदादा शेतकऱ्यांना म्हणाले, घाबरू नका...सरकार आपल्या पाठिशी

मीननाथ पानसरे
Friday, 5 June 2020

जुन्नर तालुक्याला पावसाचा जोरदार तडाखा बसला आहे. तालुक्यातील सावरगाव, येणेरे या गावांना अजित पवार यांनी भेटी देऊन नुकसानीची पाहणी केली. त्यावेळी त्यांनी शेतकऱ्यांनी संवाद साधला व शेतकऱ्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला.

आपटाळे (पुणे) : निसर्ग चक्रीवादळ व पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले असून, शासनस्तरावर शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी प्रयत्नशील आहे. सरकार आपल्या पाठीशी असून, शेतकऱ्यांनी घाबरू नये, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पाहणी केली. 

पुणे जिल्ह्यातील आठवडे बाजार सुरू, या आहेत नियम व अटी

जुन्नर तालुक्याला पावसाचा जोरदार तडाखा बसला आहे. तालुक्यातील सावरगाव, येणेरे या गावांना अजित पवार यांनी भेटी देऊन नुकसानीची पाहणी केली. त्यावेळी त्यांनी शेतकऱ्यांनी संवाद साधला व शेतकऱ्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. या वेळी त्यांनी सावरगाव येथील शरद विठ्ठल महाबरे यांच्या तोंडल्याच्या बागेची,  येणेरे येथे म्हातारबा कुंडलिक ढोले यांच्या केळीच्या बागेची व ठाकरवाडी येथे बाळू भालेकर यांच्या घरकुलाची पाहणी केली. 

 अबब! शिवाजीनगर स्टेशनच्या रुळावर दिसला अजगर मग...

या वेळी जिल्हाधिकारी नवल किशोर राम, खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार अतुल बेनके, प्रांताधिकारी जितेंद्र डुडी, तहसीलदार हणमंत कोळेकर, जिल्हा बँकेचे संचालक अॅड. संजय काळे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष पांडुरंग पवार, तालुका कृषी अधिकारी सतीश शिरसाठ, सहायक गटविकास अधिकारी हेमंत गरिबे, सूरज वाजगे, बाजीराव ढोले यांसह शेतकरी उपस्थित होते. 

न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्यांना अखेर मिळणार दिलासा पण...

जुन्नर तालुक्यात सर्वाधिक नुकसान आंबा, केळी व तरकारी मालाचे झाले आहे. पश्चिम भागातील मीना नदीच्या खोऱ्यात आंबा फळपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कोट्यवधी रुपयांचा आंबा क्षणात मातीमोल झाल्याने आंबा उत्पादकांची आर्थिक घडी विस्कटली आहे. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

जुन्नर तालुक्यात अंदाजे 5735 हेक्टर क्षेत्रावरील 22 हजार 960 शेतकऱ्यांचे नुकसान, तर 35 पॉलिहाउसचे नुकसान होऊन तब्बल 40 कोटींपेक्षा जास्त नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने सांगितला आहे.
     
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ajitdada told the farmers, don't be afraid, the government is behind you