माजी विद्यार्थ्यांनो बना आता ‘ब्रॅण्ड ॲम्बॅसिडर’

सकाळ वृत्तसेवा
Friday, 22 January 2021

देशातील विद्यापीठांतून तुम्ही उच्च शिक्षण घेतलंय आणि आता माजी विद्यार्थी आहात का? आणि विद्यापीठात मिळालेल्या ज्ञानाचा, अनुभवाचा फायदा शैक्षणिक संस्था आणि विद्यार्थ्यांनाही घेता यावा, असे तुम्ही वाटतंय का?, तर मग तयार रहा! लवकरच तुम्हाला उच्च शिक्षण देणाऱ्या संस्थेचा दर्जा उंचाविण्याची किंवा भारतीय उच्च शिक्षणाचे सामर्थ्य दाखविण्यासाठी ‘ब्रॅण्ड ॲम्बॅसिडर’ बनण्याची संधी मिळू शकणार आहे.

पुणे - देशातील विद्यापीठांतून तुम्ही उच्च शिक्षण घेतलंय आणि आता माजी विद्यार्थी आहात का? आणि विद्यापीठात मिळालेल्या ज्ञानाचा, अनुभवाचा फायदा शैक्षणिक संस्था आणि विद्यार्थ्यांनाही घेता यावा, असे तुम्ही वाटतंय का?, तर मग तयार रहा! लवकरच तुम्हाला उच्च शिक्षण देणाऱ्या संस्थेचा दर्जा उंचाविण्याची किंवा भारतीय उच्च शिक्षणाचे सामर्थ्य दाखविण्यासाठी ‘ब्रॅण्ड ॲम्बॅसिडर’ बनण्याची संधी मिळू शकणार आहे.

होय, देशातील शिक्षण संस्थांचा दर्जा जागतिक पातळीवर उंचाविण्यासाठी माजी विद्यार्थी आणि माजी विद्यार्थी सेलची ताकद उपयोगी ठरू शकते. या हेतूने आता विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) विद्यापीठांना माजी विद्यार्थ्यांशी जोडण्याच्या सूचना दिल्या आहेत. विद्यापीठांमधील ‘ॲल्युमनी सेल’ची माहिती माजी विद्यार्थ्यांना कळविण्याची सूचना केली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मध्ये देशातील उच्च शिक्षण संस्थांना जागतिक पातळीवर पोचविण्यावर भर दिला आहे. येत्या काही वर्षात देशाला जागतिक अभ्यास केंद्र बनविण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. म्हणूनच शैक्षणिक संस्थांमधील माजी विद्यार्थी आणि माजी विद्यार्थी संघटना शैक्षणिक दर्जा उंचाविण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. शैक्षणिक संस्थांना आर्थिक आणि त्या व्यतिरिक्त योगदानही त्यांच्याकडून मिळू शकते. तसेच देशातील विद्यापीठांमध्ये शिक्षण घेतलेले परदेशी विद्यार्थी आणि सध्या परदेशात असलेले भारतीय विद्यार्थी हे देखील शैक्षणिक संस्थांच्या ‘ब्रॅण्ड बिल्डिंग’साठी हातभार लावू शकणार आहेत, असे आयोगाचे सचिव प्रा. रजनीश जैन यांनी सूचनेद्वारे अधोरेखित केले आहे.

राजीव गांधी प्राणिसंग्रहालयातील हरणांच्या मृत्यूची चौकशी करा; महापौरांचे आदेश

‘ॲल्युमनी कनेक्‍ट’ उपक्रम 
विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा शैक्षणिक संस्थांची जोडून घेण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने ‘ॲल्युमनी कनेक्‍ट’ हा उपक्रम हाती घेतला आहे. या माध्यमातून विविध विद्यापीठांमधील माजी विद्यार्थ्यांची आणि त्यांच्या संघटनांची माहिती संकलित करण्यात येत आहे. या विद्यार्थ्यांना विद्यापीठातील घडामोडीत सहभागी करून घेण्याच्या सूचना केल्या आहेत. तसेच विद्यापीठांमधील ‘ॲल्युमनी सेल’ची माहिती १५ फेब्रुवारीपूर्वी द्यावी, असे आवाहन आयोगाने केले आहे.

घासून नाय, ठासून आलोय, जो भाऊ आणि कमला अक्कांचे हार्दिक अभिनंदन ! पुण्यात लागलं पोस्टर

या आहेत यूजीसीची सूचना 

  • ‘ॲल्युमनी सेल’ स्थापन करून माजी विद्यार्थ्यांची माहिती संकलित करा
  • शैक्षणिक संस्थेतील नवीन घडामोडींची माहिती माजी विद्यार्थ्यांना द्या
  • विविध परिषदा, वेबिनारमध्ये त्यांना सहभागी करून घ्या
  • स्नेहमेळावे आयोजित करा
  • शैक्षणिक संस्थेच्या विकासासाठी सहकार्य घ्या

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Alumni Become Brand Ambassadors