राजीव गांधी प्राणिसंग्रहालयातील हरणांच्या मृत्यूची चौकशी करा; महापौरांचे आदेश

Mayor order to Investigate the death of deer at the Rajiv Gandhi Zoo katraj pune
Mayor order to Investigate the death of deer at the Rajiv Gandhi Zoo katraj pune

पुणे : कात्रज येथील राजीव गांधी प्राणिसंग्रहालयात कुत्र्यांच्या हल्ल्यात चार हरणांच्या झालेल्या मृत्यूची चौकशी तत्काळ करावी, असा आदेश महापौर मुरलीधर मोहोळ यांनी बुधवारी महापालिका प्रशासनाला दिला. 

हेही वाचा - जो बायडन यांचं मंत्रिमंडळ 'डन'; असं झालंय खातेवाटप 

महापालिकेची सर्वसाधारण सभा सुरू होता मनसेकडून हरणांची प्रतिकात्मक स्वरूपात तिरडी सभागृहात आणण्यात आली. तसेच "राजीव गांधी प्राणिसंग्रहालयातील प्राणी वाचवा' अशा घोषणा देण्यास सुरवात केली. या घटनेला 10 दिवस उलटून गेल्यानंतरही त्या ठिकाणी उपाययोजना केल्या नाहीत. त्याचबरोबर शहरातील अनेक उद्यानांची दुरवस्था झाली आहे, याकडे मनसेचे गटनेते वसंत मोरे यांनी लक्ष वेधले. या आंदोलनामध्ये कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेवकांनीही सहभाग घेतला. महापालिका प्रशासनाने यावर खुलासा करावा, अशी मागणी नगरसेवकांनी केली. 

हेही वाचा - माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे नवे निवासस्थान समुद्रकिनारी; 1100 कोटी डॉलर्स किंमत
 

त्यावेळी महापौर म्हणाले, "राजीव गांधी प्राणिसंग्रहालयात प्राण्यांच्या सुरक्षेच्यादृृष्टीने तत्काळ उपाययोजना राबवाव्यात. त्याचबरोबर ही घटना कशामुळे घडली, याला कोण जबाबदार आहेत, याची चौकशी महापालिका प्रशासनाने करावी.'' 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com