सहकारमंत्री अमित शहा २६ नोव्हेंबरला पुण्यात येणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अमित शहा

सहकारमंत्री अमित शहा २६ नोव्हेंबरला पुण्यात येणार

पुणे : केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा येत्या २६ नोव्हेंबरला महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत. सहकार मंत्री झाल्यानंतर ते प्रथमच महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत असून पुण्यातील वैकुंठभाई मेहता सहकारी संस्थेस भेट देणार आहेत. ज्येष्ठ नेते शरद पवार अध्यक्ष असलेल्या वसंतदादा शुगर इस्न्टिट्यूटच्या भेटीचा या दौऱ्यात समावेश आहे.

हेही वाचा: मुंबई मनपाला अध्यादेशाची प्रतीक्षा; निवडणूक लांबणीवर पडणार?

शहा यांच्या दौऱ्याची तयारी करण्यासाठी येत्या १६ नोव्हेंबरला केंद्रीय सहकार विभागाची टीम पुण्यात येणार आहे. वैकुंठभाई मेहता संस्था तसेच वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला भेट देऊन दौऱ्याच्या तयारीची माहिती घेणार आहेत. या दोन संस्थाशिवाय सहकारात काम करणाऱ्या इतर व्यक्तींची शहा भेट घेण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, त्याचा तपशील मिळू शकला नाही.

हेही वाचा: मुंबई पोलिसांकडून 6 कोटींच्या ड्रग्जसह नायजेरियन तरुणाला अटक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या दुसऱ्या कार्यकाळात शहा यांच्याकडे गृहमंत्रीपद देण्यात आले. त्यानंतर सहा महिन्यांपूर्वी केंद्रात सहकार खाते स्थापन करण्यात आल्यानंतर पहिले सहकार मंत्री म्हणून अमित शहा यांच्याकडे या खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. सहकार चळवळ मुख्यत: महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यात मोठ्याप्रमाणात आहे. अमित शहा स्वत: अहमदाबात जिल्हा सहकारी बँकेचे अनेक वर्षे अध्यक्ष होते.सहकारात काम केले असल्याने त्यांच्याकडे या खात्याचा कारभार देण्यात आला आहे.

हेही वाचा: T20 WC : पाकचं काही खरं नाही, झुंजारु गडी सेमी फायनलला मुकणार?

शहा यांच्याकडे सहकार विभागाची जबाबदारी देण्यात आल्यानंतर राज्यातील सहकार चळवळीत केंद्राचा हस्तक्षेप वाढणार यावरून राज्यात बरीच चर्चा झाली होती. सहकार हा राज्याचा विषय असल्याने केंद्र सरकार त्यात हस्तक्षेप करू शकत नाही, असे सांगण्यात येत आहे. या पाश्‍र्वभूमीवर शहा यांचा सहकार मंत्री म्हणून पहिला दौरा चर्चेचा ठरत आहे.

loading image
go to top