आंबेगावातील नागरिकांची धाकधूक वाढली, कोरोनाचे आणखी 18 रुग्ण

corona1
corona1

मंचर (पुणे) : आंबेगाव तालुक्यात कोरोनाचे आणखी १८ रुग्ण आढळून आले आहेत. त्यामध्ये मंचर येथील चार व महाळुंगे पडवळ येथील सात व पारगाव शिंगवे येथील पाच रुग्णांचा समावेश आहे. तालुक्यात पॉझिटिव्ह आलेल्या एकूण रुग्णांची संख्या ११४  पर्यंत पोहोचली आहे. अजून दहा जणांचे तपासणी अहवाल प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे.

मंचर हे तालुक्याचे मध्यवर्ती ठिकाण असून, आज मिळालेल्या चार पॉझिटिव्ह रुग्णांमुळे येथील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 26 पर्यंत गेली आहे. टाव्हरेवाडी, घोडेगाव येथे प्रत्येकी एक व पारगाव शिंगवे येथे पाच, महाळुंगे पडवळ येथे ७, असे एकूण 1८  रुग्ण पॉझिटिव्ह आहेत. ५४ रुग्णांवर उपचार सुरु असून, तीन जणांचा मृत्यू झाला आहे. ५७ जण बरे झाले आहेत, अशी माहिती आंबेगाव तालुक्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश ढेकळे यांनी दिली.

आंबेगाव तालुक्याने शंभरी पार केल्यामुळे व अजूनही पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या थांबत नसल्यामुळे प्रशासनाची धाकधूक वाढू लागली आहे. संपूर्ण तालुक्यात 104 गावात लॉकडाउनची काटेकोरपणे अंमलबजावणी सुरू आहे. रुग्ण आढळून आलेल्या गावांच्या सीमा सील केलेल्या आहेत. खेड विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली मंचर व घोडेगाव शहरात पाच पोलिसांची भरारी पथक कार्यरत करण्यात आली आहेत. त्यांच्या मदतीसाठी ग्रामपंचायतीचे कर्मचारी आहेत. विनामास्क रस्त्याने फिरणारे, अनावश्यक गर्दी करणारे, गपचूप दुकाने उघडणारे यांच्यावर करडी नजर ठेवून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचे सत्र सुरू झाले आहे. या कामकाजावर निगराणी ठेवण्याचे काम मंचर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे व घोडेगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप पवार करत आहेत.

कोरोनाच्या लढ्यात पुण्यातील गणपती मंडळांचा सहभाग
 
मंचर उपजिल्हा रुग्णालयात एकूण १४ रुग्ण दाखल आहेत. चार जणांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत. ११ पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यापैकी दोन जणांची प्रकृती सुरवातीला गंभीर होती. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. सध्या चार रुग्ण अत्यावस्थ आहेत. अन्य ७ रुग्णांच्या प्रकृतीतही सुधारणा झाली असल्याची माहिती मंचर उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. चंदाराणी पाटील यांनी दिली. उर्वरित रुग्णांवर वडगाव काशिंबेग येथील भीमाशंकर आयुर्वेदिक हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. त्यांच्या व्यवस्थेची पाहणी गट विकास अधिकारी जालिंदर पठारे व आरोग्य खात्यातील कर्मचारी करत आहेत. कोरोनाचे महाभयंकर संकट आटोक्यात यावे यासाठी प्रशासन रात्रंदिवस काम करत आहे. विशेषता आशा वर्कर यांनी घरोघर जाऊन सर्वेक्षणाचे काम सुरू केले आहे.

मंचर शहरात आतापर्यंत 26 जणांना कोरोनाची लागण झालेली आहे. त्यापैकी एकाचा मृत्यू झाला आहे. चार जण उपचार घेत असून, 21 जणांना उपचार करून घरी सोडले आहे, अशी माहिती सरपंच दत्ता गांजाळे यांनी दिली. मंचर ग्रामपंचायतीने शहरात आवश्यक त्या उपाययोजना सुरू केल्या आहेत. लॉकडाउनची काटेकोरपणे अंमलबजावणी सुरू आहे, अशी माहिती ग्रामविकास अधिकारी सचिन उंडे यांनी दिली 
    
Edited by : Nilesh Shende

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com