पुणे जिल्ह्यातील भाजपच्या या डॅशिंग नेत्याला कोरोना  

corona
corona

राजगुरूनगर (पुणे) : खेड तालुक्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, आज ५५ कोरोनाबधित आढळले. एकूण रुग्णसंख्या १९४६ झाली आहे. तालुक्यात आज दोन मृतांची नोंद झाली, अशी  माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. बी. बी. गाढवे यांनी दिली. राजगुरूनगरमध्ये काही प्रतिष्ठितांना कोरोनाची लागण झाली असून, आज भाजपचे जिल्हा परिषद सदस्य आणि खेड तालुका अध्यक्ष अतुल देशमुख यांची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली. त्यामुळे ते सध्या क्वारंटाइन झाले आहेत. 

खेड तालुक्यात कोरोनाबधितांच्या संख्येने २ हजाराकडे मार्गक्रमण सुरू केले आहे. चाकण येथील ६५ वर्ष वयाच्या ज्येष्ठाचे आणि आळंदी येथील ९२ वर्ष वयाच्या वृद्धाचे १२ ऑगस्ट रोजी निधन झाले. कामगारांमध्ये प्रादुर्भावाचे जास्त प्रमाण असलेला कोरोना आता प्रतिष्ठीतांच्या घरांमध्येही घुसला असून, रोज एखादया प्रतिष्ठाताचे किंवा कुटुंबियाचे नाव तालुक्याच्या यादीत येत आहे. 

तालुक्यात गेल्या चोवीस तासात चाकणला ११, आळंदीत २ आणि राजगुरूनगरला १६ रूग्णांची भर पडली. तालुक्याच्या ग्रामीण भागात २६ रुग्ण सापडले. मरकळ येथे चार रुग्ण आढळले, तर कुरुळी, कान्हेवाडी, काळूस, धानोरे, चऱ्होली, राक्षेवाडी या ठिकाणी प्रत्येकी २ रूग्ण आढळले. तसेच, कुरकुंडी, निघोजे, मेदनकरवाडी, चिंबळी, आंबेठाण,   शेलपिंपळगाव, शेलगाव, भोसे, कनेरसर आणि रेटवडी येथे प्रत्येकी १ रुग्ण सापडला. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com