बारामतीत आज पुन्हा एका कोरोना रुग्णाचा मृत्यू

मिलिंद संगई
Sunday, 9 August 2020

काल घेतलेल्या 101 संशयित नमुन्यांमध्ये 13 जण बारामती शहरातील तर 2 जण ग्रामीण भागातील आहेत. 9 जणांचा अहवाल अजून प्रतिक्षेत असून 77 जण आतापर्यंत निगेटीव्ह आढळले आहेत. 

बारामती : शहरातील कोरोनाचा उद्रेक वाढू लागला असून लोकांची काळजीही आता वाढतच चालली आहे. आज बारामतीत एका  तरुणाचा कोरोनाने मृत्यू झाल्याने अनेक जण हवालदिल झाले आहेत. हा रुग्ण ठणठणीत बरा होता, त्याला इतर काहीही आजार झालेले नव्हते, चार दिवसात त्याचा मृत्यू झाल्याने आज बारामतीत याच एका विषयाची चर्चा आहे. लोकांचा मानसिक ताण वाढू लागला असून आज पुन्हा एकाच दिवसात 15 रुग्ण कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाल्याने लोकांची धडधड वाढली आहे. बारामतीच्या कोरोनाग्रस्तांचा आकडा आता 251 वर जाऊन पोहोचला असून मृतांचा आकडाही 17 वर गेला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

काल घेतलेल्या 101 संशयित नमुन्यांमध्ये 13 जण बारामती शहरातील तर 2 जण ग्रामीण भागातील आहेत. 9 जणांचा अहवाल अजून प्रतिक्षेत असून 77 जण आतापर्यंत निगेटीव्ह आढळले आहेत. 

शहरातील विवेकानंद नगर, प्रगतीनगर, वसंतनगर, हरिकृपानगर, मुजावरवाडा, म्हाडा कॉलनी, एमआयडीसी, भोई गल्ली, इंदापूर रोड येथील तर ग्रामीण भागातील  धुमाळवाडी व खताळपट्ट्यातील रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. शहरातील सर्वच भागातून आता वेगाने रुग्ण समोर येऊ लागल्याने हा संसर्ग रोखण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर आहे. आजही एका दहा वर्षांच्या मुलास कोरोनाची लागण झालेली असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर लहान मुलांमध्येही कोरोनाचा फैलाव होऊ लागल्याचे दिसत आहे. 

आठ दिवसांनी दिसतात कोरोनाची लक्षणे; नव्या संशोधनातून समोर आली माहिती

शहरातील एका युवकाचा झालेला मृत्यू हा मात्र सर्वांनाच काळजी करायला लावणारा आहे. विविध भागातून कोरोनाचे रुग्ण समोर येऊ लागल्याने नागरिकांनीच या बाबत काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. 

पुण्यात बेड न मिळण्याचेही संकट
अत्यवस्थ रुग्णांना पुण्याला हलविताना पुण्यातही बेडच मिळत नसल्याच्या तक्रारी पुढे येत आहे. महत्वाच्या रुग्णालयांमध्ये जागाच उपलब्ध नसल्याने नातेवाईकही हतबल होताना पाहायला मिळत आहेत. ग्रामीण भागातच आता पुण्याच्या धर्तीवरची सर्वच सुविधा गरजेची असल्याचे मत नागरिक व्यक्त करीत आहेत. 

लय भारी, पुण्यातील या 11 शिक्षकांनी मिळवली आयआयटीची पदवी

आता एलपीजी सिलिंडर बुकिंग व्हाॅट्सअपवर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Another corona patient dies in Baramati today