आता महाराष्ट्र केसरी स्पर्धेतही होणार डोपिंग टेस्ट?

Wrestling.jpg
Wrestling.jpg

पुणे : ''महाराष्ट्राला कुस्तीची परंपरा फार मोठी आहे. कुस्तीला राजाश्रय संपल्यानंतर लोकाश्रयावर आजही कुस्ती जनमाणसात लोकप्रिय असा एक प्राचीन खेळ आहे. कुस्तीला बदनाम करणाऱ्या घटकांवर, कुस्ती मारक असलेल्या विषयावर चर्चा होत नाही. उत्तेजक द्रव्य ही यापैकी एक महत्वाची आणि संवेदनशील गोष्ट आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात 'महाराष्ट्र केसरी कुस्ती' स्पर्धेसह अनेक राज्यस्तरीय जसे शालेय, 'ज्युनिअर', 'सब ज्युनिअर' स्पर्धेमध्ये 'डोपिंग' चाचणी सक्तीची करावी अशी मागणी अर्जुनवीर काकासाहेब पवार यांनी केली.

सुटीहून परतलेल्या पुणेकरांची रिक्षा, कार चालकांकडून लूट

महाराष्ट्र केसरी सह सर्व राज्यस्तरीय ज्यामध्ये शालेय, ज्युनिअर सब ज्युनिअर स्पर्धेत डोपिंग टेस्ट घेण्यासाठी NADA संस्थेकडे जाणार असल्याची माहिती काकासाहेब पवार यांनी दिली. ''महाराष्ट्राचे कुस्ती क्षेत्र वाचवायचे असेल तर सर्वांनी या मागणीचा पाठपुरावा करावा.जे खेळाडू उत्तेजक द्रव्ये घेतात त्यांनी त्यापासुन दूर रहावे. 'डोपिंग' चाचणी साठी आग्रह धरला पाहिजे. दरवर्षी हा आग्रह केला गेला पाहिजे. तरच कष्टाळू गरीब मुलांना न्याय मिळेल व उत्तेजक द्रव्यांच्या विळख्यात असणारी कुस्ती मोकळा श्वास घेईल.'' असे ही त्यांनी सांगितले.

Video : 'गाव तिथे ग्रंथालया'साठी चार हजार पुस्तके गोळा

कोणत्याही ज्ञानशिवाय पैलवान आज उत्तेजक द्रव्ये इंजेक्शन,गोळ्या अश्या स्वरुपात घेत आहेत.

वस्ताद व पालक यांच्या डोळ्यामागे होणारे उत्तेजक द्रव्यांचे सेवन :
- पालक पैलवानांना मोठ्या तालमीत पाठवतात. हळूहळू मैदाने, स्पर्धा यातून ओळखी वाढली जाते. दुसरा घेतोय तर आपणही घ्यावे किंवा ते घेतल्याशिवाय जोड वाढणार नाही असे कित्येक गैरसमज मनात बिंबवून याची सुरवात होते. याची कल्पना ना वस्ताद मंडळींना असते ना पालकांना.

पुण्याचा प्रसाद दुसऱ्यांदा ‘आयर्नमॅन’

कोणत्याही ज्ञानशिवाय घेतली जाणारी औषधे व बेफाम दिला जाणारा पैसे :
- हे उत्तेजक द्रव्ये घेणारे आपण काय घेतोय याची जराही कल्पना होती नसते.ज से की टर्मिन सारखे औषध लो ब्लड प्रेशर रुग्णासाठी असते तर ते सुद्धा अतिरिक्त प्रमाणात घेतले जाते.शिवाय चार पाचशे हजार रुपयांचे औषध दहा पंधरा हजाराला विकणारे लोकही आहेत.

'डोपिंग' चाचणी :
- सध्या केवळ राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर 'डोपिंग' चाचणी घेतली जाते. राष्ट्रीय उत्तेजक विरोधी संस्था (National anti dipping agency) ही संस्था राष्ट्रीय स्पर्धेत खेळाडूंची 'डोपिंग' चाचणी घेते तर आंतरराष्ट्रीय उत्तेजक द्रव्य सेवन विरोधी संस्था (World anti dopping agency) ही आंतरराष्ट्रीय स्तरावर 'डोपिंग' चाचणी घेते.त्यामुळे राज्य स्पर्धा यातून आपोआप वाचल्या जात आहेत. शिवाय 'डोपिंग' चाचणी अशी सांगून न घेता शंका असणारे खेळाडू सरळ पकडून नेऊन त्यांचे रक्त लघवी नमुने घेतले जातात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com