esakal | बासमतीचा सुगंध परदेशातही दरवळणार
sakal

बोलून बातमी शोधा

Rice-Export

देशात यंदा सर्वत्र समाधानकारक पाऊस पडल्यामुळे तांदळाच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. परिणामी, चालू वर्षात भारतातून तब्बल १४० लाख टन तांदळाची निर्यात होणार असल्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. ही निर्यात उच्चांकी असणार आहे. मागील वर्षी साधारणतः ९५ लाख टनाची निर्यात झाली होती. या वर्षी तांदळाच्या निर्यातीचा विक्रम होणार असल्याचा अंदाज तांदळाचे व्यापारी व फेडरेशन ऑफ असोसिएशन महाराष्ट्र (फाम)चे वरिष्ठ उपाध्यक्ष राजेश शहा यांनी व्यक्त केला आहे.

बासमतीचा सुगंध परदेशातही दरवळणार

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

उत्पादन वाढल्याने १४० लाख टनांपर्यंत होणार निर्यात
मार्केट यार्ड - देशात यंदा सर्वत्र समाधानकारक पाऊस पडल्यामुळे तांदळाच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. परिणामी, चालू वर्षात भारतातून तब्बल १४० लाख टन तांदळाची निर्यात होणार असल्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. ही निर्यात उच्चांकी असणार आहे. मागील वर्षी साधारणतः ९५ लाख टनाची निर्यात झाली होती. या वर्षी तांदळाच्या निर्यातीचा विक्रम होणार असल्याचा अंदाज तांदळाचे व्यापारी व फेडरेशन ऑफ असोसिएशन महाराष्ट्र (फाम)चे वरिष्ठ उपाध्यक्ष राजेश शहा यांनी व्यक्त केला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

चांगल्या पावसामुळे बासमती तसेच इतर प्रकारच्या तांदळाचे उत्पादन वाढणार असल्यामुळे यावेळी तांदूळ निर्यातीत देशाचा पहिला क्रमांक असणार आहे. इतर वेळी तांदूळ निर्यातीत भारत तिसऱ्या स्थानावर असतो. थायलंड पहिल्या, तर व्हिएतनाम दुसऱ्या क्रमांकावर असतो. भात शेतीच्या क्षेत्रात घट झाल्याने थायलंड केवळ ६० ते ७० लाख टन तांदळाची निर्यात करू शकणार आहे. व्हिएतनाममध्ये दुष्काळजन्य परिस्थितीमुळे त्यांचीही तांदळाची निर्यात घटणार आहे.

हायटेक चोरटे; पुण्यात सिंहगड रस्त्यावर गुगल पेचा वापर करुन जबरी चोरी

यावेळी आफ्रिकन देशांकडूनही नॉन बासमती तांदळाला मोठ्या प्रमाणावर मागणी वाढली असल्यामुळेही यावर्षी निर्यातीत वाढ होईल. मागील वर्षी आपली नॉन बासमती तांदळाची निर्यात ही मागील आठ वर्षातील सर्वांत कमी झाली होती. परंतु यावर्षी आपल्या देशातील तांदळाचे जास्त उत्पादन झाल्यामुळे निर्यात मागील वर्षीच्या सुमारे ४५ टक्‍क्‍यांपर्यंत वाढणार आहे. त्यामुळे देशात परकीय चलन मोठ्या प्रमाणावर वाढेल असे शहा यांनी सांगितले.

अंतिम वर्षाच्या ऑनलाईन परीक्षा सुरळीत पण, अनेकांना वेळ पुरलाच नाही कारण..

यामुळे वाढणार निर्यात
थायलंडच्या तुलनेत भारतात चांगला पाऊस 
योग्य पावसामुळे उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ

या देशांत होते सर्वाधिक भातशेती 
भारत, थायलंड आणि व्हिएतनाम

या देशांत होते निर्यात
इराण, इराक व सौदी अरेबिया या देशांना बासमती
बांगलादेश, नेपाळ, बेनिन आणि सेनेगल या राष्ट्रांना नॉन बासमती

Edited By - Prashant Patil

loading image
go to top