कार चोरण्यासाठी विमानाने प्रवास करणाऱ्या 'हायप्रोफाईल' चोरट्याला पुण्यात अटक

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 11 February 2020

चनप्रित व त्याचा साथीदार या दोघांच्या भागिदारीत रावेत येथे गॅरेज असून ते इंन्शुरंस कंपनीनकडून अपघातात नुकसान झालेल्या मोटारी कागदपत्रांसह विकत घेवून विकत घेतलेल्या मोटारीच्या मॉडेलची व रंगाची मोटार पंजाब, हरियाणा, दिल्ली व इतर राज्यातून चोरायचे. त्या मोटारीवर अपघातातील मोटारीचा चेसीस नंबर असलेला भाग लावून मोटारीची पुन्हा विक्री करीत असल्याचे ​तपासात निष्पन्न झाले.
 

पिंपरी : पंजाब, हरियाणा येथून अलिशान मोटारींची चोरी करून त्याची विक्री करण्यासाठी पुण्यातील गॅरेजमध्ये ठेवायची. त्यानंतर पुन्हा दुसरी मोटार चोरण्यासाठी विमानाने पंजाब, हरियाणाला जाणाऱ्या 'हायप्रोफाईल' चोरट्याला गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने जेरबंद केले आहे. त्याच्याकडून 12 अलिशान मोटारी व 15 मोटारींचे इंजिन असा एकूण सव्वा दोन कोटींचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. 

पुणे पोलिस पडले प्रेमात, पाहा कोण आहे Valentine?

चनप्रित हरविंदरपाल सिंह (वय 43, रा. एस.बी. पाटील रोड, रावेत) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. रावेतमधील गणेशनगर येथील एका गॅरेजमध्ये चोरीची दोन वाहने उभी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांना गॅरेजवर छापा टाकून चनप्रित याला ताब्यात घेतले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
 

याठिकाणी मिळालेल्या इनोव्हा मोटारीवर महाराष्ट्र पासिंगचा नंबर होता, मात्र त्याच्या इंजिन नंबरवरून खात्री केली असता ही मोटार पंजाब राज्यातील असल्याची निष्पन्न झाले. यासह येथील स्विफ्ट मोटारीवरील नंबरही खोटा असल्याचे समोर आले. यावरून चनप्रित याने ही वाहने चोरून त्यांच्या चेसीस व इंजिन नंबरमध्ये फेरफार केल्याचे उघड झाले. या गुन्ह्यात चनप्रित याला अटक करून 13 दिवसांची कोठडी घेण्यात आली.

पुणे : ऍट्रोसिटीची भीती दाखवत उकळली 75 लाखाची खंडणी

चनप्रित व त्याचा साथीदार या दोघांच्या भागिदारीत रावेत येथे गॅरेज असून ते इंन्शुरंस कंपनीनकडून अपघातात नुकसान झालेल्या मोटारी कागदपत्रांसह विकत घेवून विकत घेतलेल्या मोटारीच्या मॉडेलची व रंगाची मोटार पंजाब, हरियाणा, दिल्ली व इतर राज्यातून चोरायचे. त्या मोटारीवर अपघातातील मोटारीचा चेसीस नंबर असलेला भाग लावून मोटारीची पुन्हा विक्री करीत असल्याचे ​तपासात निष्पन्न झाले.

- पुण्याच्या बातम्यांसाठी येथे ► क्लिक करा

आरोपी चोरीच्या मोटारींना अपघात झालेल्या मोटारींचा चेसीस नंबर लावून ती मोटार दहा ते बारा लाख रूपयांपर्यंत विकत होते. विक्री केलेल्या चार इनोव्हा, दोन वेरना तसेच फॉर्च्युनर, मारूती स्विफ्ट, मारूती इर्टिगा, मारूती आल्टो, फोक्‍सवॅगन पोलो, मारूती रिट्‌स प्रत्येकी एक अशाप्रकारे बारा अलिशान मोटार जप्त केल्या आहेत. यासह रावेत व कोंढवा येथील गोडाऊनमधून इन्शुरंस कंपनीकडून अपघातात नुकसान झालेल्या मोटारींचे 13 इंजिन यासह पंजाब व दिल्ली येथून चोरीस गेलेल्या मोटारींचे दोन इंजिन असा एकून दोन कोटी 19 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. या मोटारी पुणे शहर, पिंपरी-चिंचवड, नवी मुंबई. नागपूर, गोवा, सातारा, अहमदनगर, आळेफाटा या भागातून जप्त केल्या आहेत. 

एसटी महामंडळाच्याही आता "ई-बस' 

चनप्रित हा पंजाब पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर मोटार चोरीचे दहा गुन्हे दाखल आहेत. चनप्रित हा पंजाब, हरियाणा व इतर राज्यातून मोटार चोरून ती स्वत:ह चालवित पुण्याला घेवून यायचा. व ही मोटार साथीदाराकडे ठेवून पुन्हा दुसरी मोटार चोरण्यासाठी विमानाने दिल्ली अथवा पंजाबला जात असल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे. त्याचा साथीदार फरारी असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

खासगी बसगाड्यांना पालिका लावणार ‘जॅमर’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Arrested thief at pune used to travel by aeroplane for stealing Car in Punjab and Haryana