भारत बायोटेकच्या अध्यक्षांचा उद्विग्न सवाल ते जपानमध्ये धर्मांतराची लाट, महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर

सकाळ वृत्तसेवा
Friday, 15 January 2021

राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे हे बलात्काराच्या आरोपांमुळे अडचणीत सापडले आहेत. मात्र त्यांना पक्षाकडून दिलासा मिळाला आहे. धनंजय मुंडे यांचा तूर्तास राजीनामा घेतला जाणार नसल्याची माहिती समोर आली आहे.

Breaking News : धनंजय मुंडेना पक्षाकडून मोठा दिलासा; राष्ट्रवादीच्या बैठकीत 'असा' झाला निर्णय
राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे हे बलात्काराच्या आरोपांमुळे अडचणीत सापडले आहेत. मात्र त्यांना पक्षाकडून दिलासा मिळाला आहे. धनंजय मुंडे यांचा तूर्तास राजीनामा घेतला जाणार नसल्याची माहिती समोर आली आहे. - सविस्तर वाचा

या देशात प्रत्येकजण संशयखोर का? भारत बायोटेकच्या चेअरमनचा सवाल
भारतात 16 जानेवारीपासून आपत्कालीन वापरासाठी म्हणून लसीकरणास सुरवात होत आहे. पहिल्या टप्प्यातील लसीकरणामध्ये तीन कोटी लोकांना लस देण्यात येणार आहे. - सविस्तर वाचा

जपानमध्ये धर्मांतराची लाट? 10 वर्षांत मुस्लीम लोकसंख्येचा आकडा झाला दुप्पट!
जपान सध्या दुहेरी संकटाशी झुंजत आहे. एकीकडे जपानची लोकसंख्या घटत आहे आणि दुसरीकडे जन्मदरही कमी होत आहे. तसेच जपानमध्ये मोठ्या प्रमाणात होणारा धर्मांतराचा विषयही चिंतेचा आहे. - सविस्तर वाचा

लसीकरणाआधी केंद्र सरकारची राज्यांना विशेष सूचना; तुमच्यासाठीही महत्त्वाचे
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) 16 जानेवारीला देशव्यापी कोविड-19 लसीकरण (COVID-19 Vaccine) अभियानाला सुरुवात करणार आहेत. - सविस्तर वाचा

दहावी-बारावी पास उमेदवारांसाठी मोठी संधी; फक्त मुलाखत द्या अन् सरकारी नोकरी मिळवा
केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी संशोधन संस्था (CEERI) मध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया आयोजित करण्यात येणार आहे. ट्रेड अ‍ॅप्रेंटिसची रिक्त पदे या भरतीच्या माध्यमातून भरली जाणार आहेत. - सविस्तर वाचा

पुणेकरांच्या खिशाला किती कात्री?
पाषाण परिसरात तुमच्या मालकीची वीस वर्षं जुनी आणि पाचशे चौरस फुटांची (बिल्टअप) सदनिका असेल, तर तुम्हाला चाळीस टक्‍क्‍यांची सवलत, देखभाल दुरुस्तीची १५ टक्के सवलत आणि पाणीपट्टी धरून सुमारे ४  हजार १८ रुपये दरवर्षी मिळकत कर (प्रॉपर्टी टॅक्‍स) येतो. - सविस्तर वाचा

कॅन्सरचा विळखा : साडेतीनशेवर चिमुकले मृत्यूच्या दाढेत; ७ वर्षांत दगावले ४०० वर मुले
मागील सात वर्षांत मेडिकलच्या कॅन्सर विभागात (रेडिओग्राफी) एक हजारावर कॅन्सरग्रस्त चिमुकल्यांनी प्रत्यक्ष उपचार घेतले आहेत. - सविस्तर वाचा

आजी माजी आमदारांच्या गावात ईव्हीम मशीन पडले बंद
सडोली खालसा (ता. करवीर) येथे प्रभाग क्रमांक २ चे ईव्हीम मशीन बंद पडल्याने सकाळी एकच गोंधळ उडाला. सकाळी ७.३० वाजता मशीनची चाचणी घेताना सिग्नल न आल्याने हा प्रकार लक्षात आला. - सविस्तर वाचा

महापालिका अधिकाऱ्यांची पत्रकाराला मारहाण; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
महापालिका कर्मचारी-अधिकाऱ्यांच्या सुरू असलेल्या धिंगाण्याचे छायाचित्र काढणाऱ्या सिडकोतील पत्रकारास बेदम मारहाण करत शिवीगाळ करणाऱ्याविरोधात अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. - सविस्तर वाचा

‘डब्लूएचओ’चे पथक वुहानमध्ये
कोरोना विषाणूच्या उगमाबाबत तपास करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेच्या तज्ज्ञांचे पथक आज वुहान येथे पोहोचले. या पथकाला प्रवेश देण्यात चीनने अनेक दिवस टाळाटाळ केली होती. - सविस्तर वाचा

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Morning news latest updates dhananjay munde ncp bharat biotech japan muslim coronavaccine pune who