भाडेकरूंनो, घर मालकांवर गुन्हा दाखल करण्यापूर्वी...

Association of Real Estate Agents Request to solve Disputes between tenants and landlords amicably
Association of Real Estate Agents Request to solve Disputes between tenants and landlords amicably
Updated on

पुणे : भाडेकरू आणि घरमालकांमधील वाद किंवा अडचणी समजून घेऊन प्रकरणे सामंजस्याने सोडविण्याची गरज आहे. घरमालकांवर गुन्हे दाखल करण्यापूर्वी त्यांच्या समस्या समजून घ्याव्या, अशी विनंती असोसिएशन ऑफ रिअल इस्टेट एजंट्स या संघटनेकडून निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

संघटनेचे अध्यक्ष सचिन शिंगवी, कोषाध्यक्ष उमाशंकर यादव, सचिव राजेंद्र दोशी यांनी गृहमंत्री अनिल देशमुख, पालकमंत्री अजित पवार तसेच पोलिस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांना निवेदन दिले. नोकरी, व्यवसायाबरोबरच उत्पन्नाचा दुसरा एक स्राोत म्हणून अनेक जण सदनिका भाडेतत्त्वावर देतात. गेल्या काही वर्षांपासून मोठ्या संख्येने नोकरदार, विद्यार्थी शहरात वास्तव्यास आले आहेत. भाड्यापोटी मिळणाऱ्या पैशांमधून अनेक ज्येष्ठ नागरिक खर्च भागवतात, असे शिंगवी यांनी सांगितले.

आदिवासी महिलांच्या चेहऱ्यावरील हसू सांगतय, डोक्यावरील हंडा उतरल्याचे सुख

महानगरपालिकेचा कर, वीज बिल, सदनिका दुरुस्ती असे खर्च भाड्यातून भागवले जातात. टाळेबंदी लागू झाल्यानंतर सरकारने करभरणा माफ केला नाही. कर भरायचा असल्याने अनेकांनी भाडेकरूंकडे थकीत भाड्याबाबत विचारणा सुरू केली आहे. गृहनिर्माण विभागाने तीन महिन्यांचे भाडे टप्प्याटप्प्याने देण्याची सूचना केली आहे. याचा अर्थ घरमालकांना भाडे देऊ नये, असा काढता कामा नये. घरमालक आणि भाडेकरूंमधील एखादा वाद सामंजस्याने सोडवावा. थेट घरमालकांवर गुन्हे दाखल करणे योग्य ठरत नाही. पोलिसांनी घरमालकांविरोधात गुन्हा दाखल करण्याची कारवाई केल्यामुळे काही जण दुरुपयोग देखील करतील. भाडे देणारच नाही, अशी भूमिका काही जण घेतात, हे योग्य नाही. गुन्हा दाखल करण्यात आल्यामुळे घरमालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे, असे शिंगवी यांनी नमूद केले.

सावधान ! पुण्यातील `या` भागात तुमच्या सोबतही असा भयानक प्रकार घडू शकतो
 

भाड्यातून कर्जाचा हप्ता :
शहरात मोठ्या संख्येने परगावातील नोकरदार, शिक्षणासाठी आलेले विद्याार्थी वास्तव्यास आहेत. अनेकांनी सेवानिवृत्तीनंतर आर्थिक उत्पन्नाचा स्राोत म्हणून सदनिका घेतल्या. सदनिका भाडेतत्त्वावर देऊन अनेक ज्येष्ठ नागरिक त्यातून मिळणाऱ्या भाड्याचा वापर सेवानिवृत्ती वेतन म्हणून करतात. शहरात अनेकांनी कर्ज काढून सदनिका घेतल्या. सदनिकाच्या भाड्यातून हप्त्यांची तरतूद करण्यात येते, असे शिंगवी यांनी सांगितले.

प्रवाशांच्या गर्दीने रेल्वे स्थानक पुन्हा गजबजले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com