रुग्णांची संख्या वाढत असल्याने कॉटॅक्ट ट्रेसिंग २० पर्यंत नेण्याचा प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 21 February 2021

कोरोना पॉजिटीव्ह रुग्ण आढळल्यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्या किमान १७ जणांचे सर्वेक्षण (कॉटॅक्ट ट्रेसिंग) केले जात आहे. गेल्या काही दिवसांपासून रुग्णांची संख्या वाढत असल्याने आता किमान २० जणांचे कॉटॅक्ट ट्रेसिंग करण्यासाठी आरोग्य विभागाकडून नियोजन सुरू केले आहे.

पुणे - कोरोना पॉजिटीव्ह रुग्ण आढळल्यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्या किमान १७ जणांचे सर्वेक्षण (कॉटॅक्ट ट्रेसिंग) केले जात आहे. गेल्या काही दिवसांपासून रुग्णांची संख्या वाढत असल्याने आता किमान २० जणांचे कॉटॅक्ट ट्रेसिंग करण्यासाठी आरोग्य विभागाकडून नियोजन सुरू केले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील कोरोना पॉजिटीव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे. यामध्ये विशेषतः नगर रस्ता, वारजे, बिबवेवाडी, सिंहगड रस्ता या भागात रुग्णांची संख्या जास्त आहे. रुग्णसंख्या वाढत असल्याने महापालिका सतर्क झाली असून, रुग्णांसाठी आॅक्सिजन बेड व इतर सुविधांची तयारी सुरू केली आहे. तसेच रुग्णांच्या तपासणीचे प्रमाण वाढविण्यात आल्या असून, शनिवारी ४ हजार ६३४ जणांची तपासणी करण्यात आली असून आहे.

भाजप पदाधिकाऱ्यासह ८ जणांना अटक; गुंड गजा मारणेच्या मिरवणुकीसाठी पुरवली होती आलिशान गाडी

महापालिकेने १५ क्षेत्रीय कार्यालयांमध्ये प्रत्येकी किमान तीन क्युआरटी टीम तयार केल्या आहेत. यामध्ये आरोग्य निरीक्षक व इतर कर्मचाऱ्यांचा यामध्ये समावेश आहे. कोरोना रुग्ण सापडल्यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्या किमान १७ जणांचा शोध घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली जात आहे. या कॅटॅक्ट ट्रेसिंगमुळे कोरोनाच्या प्रसारास चाप बसतो. मात्र, गेल्या काही दिवसांपासून रुग्ण संख्या वाढत असल्याने कॉटॅक्ट ट्रेसिंगचे प्रमाण वाढविण्याच्यादृष्टीने महापालिकेने हालचाल सुरू केली असून हे प्रमाण प्रती रुग्ण २० करण्यात येणार आहे. यासाठी पीएमपीचे कर्मचारी, शिक्षक व इतर विभागातील कर्मचाऱ्यांची मदत घेतली जाणार आहे.

सदाशिव पेठेतील खानावळ सील; कोरोनाचे नियम न पाळल्याने पुणे महापालिकेचा दणका

रविवारीही चाचणी केंद्र सुरू राहणार
कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे, त्यामुळे नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी शहरातील महापालिकेची १७ कोरोना चाचणी केंद्र रविवारी सुटीच्या दिवशी सुरू ठेवली जाणार आहेत. तसेच परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील आठवड्यात आणखी तीन ठिकाणी चाचणी केंद्र सुरू केली जातील, असे सहाय्यक आरोग्य प्रमुख डॉ. संजीव वावरे यांनी सांगितले.

पुणे जिल्ह्यात लॉकडाउन? सोशल मीडियातील व्हायरल व्हिडिओवर जिल्हाधिकाऱ्यांच स्पष्टीकरण

‘‘सध्या एका रुग्णा मागे १७ जणांचे सर्वेक्षण केले जात असून, रुग्ण संख्या वाढत असल्याने हे प्रमाण किमान २० पर्यंत नेण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी क्षेत्रीय कार्यालय स्तरावर प्रत्येकी तीन क्युआरटी टीम आहेत. यामध्ये वाढ केली जाईल.’’
- डॉ. संजीव वावरे, सहाय्यक आरोग्य प्रमुख , महापालिका

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Attempts to increase contact tracing to 20 number of patients increases