CoronaVirus : इम्युनिटी वाढविण्यासाठी पोलिसाच्या पत्नीने तयार केला आयुर्वेदीक काढा

Ayurvedic Kadha is given by pune police for immunity.jpg
Ayurvedic Kadha is given by pune police for immunity.jpg
Updated on

पुणे : कोरोनापासून नागरिकांना वाचविण्यासाठी पोलिस रात्रंदिवस रस्त्यावर काढत आहेत. त्यासाठी पोलिस निरोगी असणे, तितकेच महत्वाचे आहे. हेच लक्षात घेऊन एका पोलिसाने आपल्या सहकाऱ्यांना दररोज आयुर्वेदिक काढा द्यायला सुरू केले. त्यासाठी पोलिसाची पत्नी नित्यनेमाने २५ ते ३० जणांना रोगप्रतिकारक शक्ती वाढविणारा आयुर्वेदिक काढा बनवून देण्यास विसरत नाही.कोरोनाच्य संकटात अवघे पोलिस दल एखाद्या एकत्र कुटुंब पद्धतीनुसार एकमेंकांची काळजी घेत असल्याचे "पॉझिटिव्ह" चित्र शहरात दिसत आहे.


पोलिस कर्मचारी नरेश बलसाने यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. तर त्यांच्या पत्नी संपदा बलसाने या कौटुंबिक जबाबदारी सांभाळताना आपल्या पतीसह त्यांच्या सहकाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेत आहेत. बलसाने हे सध्या दत्तवाडी पोलिस ठाण्यात कार्यरत आहेत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रस्त्यावर बंदोबस्त करताना रोगप्रतिकारक क्षमता टिकून राहावी, यासाठी बलसाने यांनी त्यांच्या पत्नी संपदा यांना दररोज आयुर्वेदिक काढा बनवून देण्यास सांगितले. त्यावेळी संपदा यांनी बलसाने यांना एकट्यालाच काढा देण्यापेक्षा त्यांच्या इतर सहकाऱ्यांनाही काढा देण्याची संकल्पना मांडली. त्यानंतर मागील एक महिन्यापासून बलसाने न चुकता रात्रपाळी करणाऱ्या आपल्या सहकाऱ्यांसाठी हा काढा घेऊन जात आहेत. सर्वजण ३ ते ४ वेळा हा काढा घेऊन पुन्हा नव्या दमाने नागरिकांच्या संरक्षणासाठी रस्त्यावर उभे राहत आहेत.

लॉकडाऊन सुरुच राहणार; दिलासा नाहीच
कोरोनामुळे पोलिस अधिकारी व कर्मचारी भावनिकदृष्ट्या अधिक जवळ आले आहेत. तर त्यांचे कुटुंबीय देखील केवळ आपल्या कुटुंबातील व्यक्तीचा विचार न करता त्यांच्या समवेत रात्रंदिवस बंदोबस्तावर असणाऱ्या सर्व पोलिस अधिकाऱ्यांचा आपल्याच कुटुंबातील सदस्य या नात्याने विचार करत असल्याचे वेगळे चित्र दिसत आहे.

असा बनवतात संपदा बलसाने आयुर्वेदिक काढा !

शरीरात रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी आयुर्वेदिक काढा महत्वाचा मानला जातो. संपदा बलसाने या तुळस, दालचिनी, काळी मिरी, सुंठ, गुळ, आले व मनुके या सर्व वस्तू एकत्र करून त्या उकळून घेतात. त्यानंतर त्याचा काढा तयार करून त्या पोलिसांना देतात. विशेषत: आयुष मंत्रालयाने त्यास प्राधान्य दिल्याचे संपदा बलसाने सांगतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com