
खडकवासला(पुणे) : धुलिवंदन रंगपंचमीच्या दिवशी धरणातील पाणी रंग मिसळल्याने पाण्याचे प्रदुषण होत होते. ते टाळण्यासाठी खडकवासला जलाशय रक्षण अभियान हिंदु जनजागृती समितीच्या वतीने मंगळवारी व रंगपंचमी निमित्त शुक्रवारी आयोजित केले आहे. परिणामी नागरिकांना या दोन्ही दिवशी धरण चौपाटी परिसरात येण्यास बंदी असणार आहे.
हा उपक्रम महसूल, पाटबंधारे विभाग, हवेली पोलिस ग्रामपंचायत खडकवासला, रणरागिणी शाखा, खडकवासला ग्रामस्थ, कमिन्स इंडिया आस्थापन
गार्गी प्रतिष्ठान, रणरागिणी शाखा यासह अन्य समविचारी संघटना उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन राष्ट्रीय संपत्तीचे संवर्धन अन् पर्यावरण रक्षण करतात.
उद्या आमदार भीमराव तापकीर यांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाची सुरुवात होईल. पोलिस निरीक्षक अशोक शेळके, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता विजय पाटील उपस्थित राहणार आहेत.
'होळी रे होळी, पुरणाची पोळी'
धुलिवंदन आणि रंगपंचमी या दिवशी रंग खेळून धरणाच्या जलाशयात उतरणे ते पाणी प्रदूषण करणे धर्म शास्त्राविसंगत आहे. हिंदु सणांच्या नावाखाली होणारे अपप्रकार थांबवण्यासाठी, तसेच हिंदूंना धर्मशास्त्र माहिती व्हावे. यासाठी हिंदु जनजागृती समिती प्रारंभीपासून प्रबोधन करत आली आहे. याचाच एक भाग म्हणून मागील 17 वर्षांपासून हिंदु जनजागृती समिती आणि समविचारी संघटना यांच्या वतीने ‘खडकवासला जलाशय रक्षण अभियान’ शतप्रतिशत यशस्वीरित्या राबवितात. यंदा अभियानाचे 18वे वर्ष असून 10 मार्च आणि 13 मार्च या दिवशी हे अभियान असणार आहे. या अभियानात सर्व नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे पराग गोखले यांनी केले. 7 मार्च या दिवशी गांजवे चौक येथील पत्रकार संघात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या परिषदेला गार्गी फाउंडेशनचे विजय गावडे, रणरागिणी शाखेच्या क्रांती पेटकर, सनातन संस्थेच्या डॉ.ज्योती काळे हे मान्यवर उपस्थित होते.
प्रामाणिकपणाच! सोळा लाखांच्या दागिन्यांची बॅग रिक्षाचालकांनी केली परत
गोखले पुढे म्हणाले की, ''मागील 17 वर्षांपासून अथक आणि अविरतपणे राबवले जाणारे हे अभियान म्हणजे राष्ट्रीय संपत्तीच्या रक्षणाचे माध्यमच आहे. पुणे शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणारा जलाशय हिंदु सणांच्या नावाखाली दूषित करणे, सर्वथा अयोग्य आहे. पाणी टंचाईचे संकटही राज्याने प्रतिवर्षी पाहिले आहे. अशा परिस्थितीत रंग खेळून पिण्याचे पाणी दूषित करणे दुदैर्वी आहे. हे रोखले जावे यासाठी अभियानात सहभागी होणारे कार्यकर्ते खडकवासला जलाशयाभोवती मानवी साखळी करून जलाशयाकडे येणार्या नागरिकांचे प्रबोधन करतील.'' 'अभियानासाठी प्रशासन सर्वतोपरी साहाय्य करेल आणि अभियानस्थळी उपस्थित रहाण्याचा प्रयत्न करू’, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. असे या संस्थेच्या वतीने सांगण्यात आले.
येस बँक प्रकरणात राणा कपूर यांच्या मुलीही आल्या अडचणीत!
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.