esakal | 'होळी रे होळी, पुरणाची पोळी'
sakal

बोलून बातमी शोधा

Holi festival is celebrated in Pune Pimpri chinchwad

भारतीय कालमापन पद्धतीनुसार फाल्गुन महिन्यात पौर्णिमेला होळी असते. यंदा सोमवारी (ता. 9) होळी सण साजरी होत आहे. होळी हा वाईट गोष्टींचा त्याग करून चांगल्या गोष्टींची सुरुवात करा, असा संदेश देणारा सण. त्यासाठी 'होलिका'दहन केले जाते. यानिमित्त गोवऱ्या, पूजेचे साहित्य, टिमक्‍या, पिचकाऱ्यांची आणि धुळवडीसाठी रंगांना मागणी वाढली.​

'होळी रे होळी, पुरणाची पोळी'

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे : 'होळी रे होळी, पुरणाची पोळी' म्हणत साजरा होणारा होळी सण सोमवारी (ता. 9) आहे. त्यानंतर मंगळवारी (ता. 10) धुळवड साजरी केली जाणार आहे. त्यासाठीचे साहित्य खरेदीसाठी रविवारी (ता. 8) सुटीचा मुहूर्त साधत नागरिकांनी बाजारपेठेत गर्दी केली होती.

प्रामाणिकपणाच! सोळा लाखांच्या दागिन्यांची बॅग रिक्षाचालकांनी केली परत

भारतीय कालमापन पद्धतीनुसार फाल्गुन महिन्यात पौर्णिमेला होळी असते. यंदा सोमवारी (ता. 9) होळी सण साजरी होत आहे. होळी हा वाईट गोष्टींचा त्याग करून चांगल्या गोष्टींची सुरुवात करा, असा संदेश देणारा सण. त्यासाठी 'होलिका'दहन केले जाते. यानिमित्त गोवऱ्या, पूजेचे साहित्य, टिमक्‍या, पिचकाऱ्यांची आणि धुळवडीसाठी रंगांना मागणी वाढली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

वाईट गोष्टी नाकारून चांगल्याची सुरुवात करताना धार्मिक व शास्त्रीयदृष्ट्या महत्त्वाच्या मानला जाणाऱ्या होळीचा सण. होळी पेटविल्यानंतर नागरिक पुरणपोळीचा नैवेद्य दाखवितात. नारळाची आहुती देतात. ते भाजल्यानंतर खोबऱ्याचा प्रसाद वाटप केला जातो. या वेळी बोंब मारण्याचीही प्रथा आहे.

येस बँक प्रकरणात राणा कपूर यांच्या मुलीही आल्या अडचणीत!
शहरात ठिकठिकाणी होळी पेटविण्यासाठी संस्था, संघटनांसह, सोसायटीतील नागरिक गोवऱ्या खरेदी करत असून पाच रुपयांना एक गोवरी विकली जात आहे. लहान मुले होळी पेटविताना मोठ्या उत्साहाने टिमक्‍या वाजवतात. त्यासाठी बाजारात 30 रुपयांपासून ते 200 रुपयांपर्यंत टिमक्‍या उपलब्ध आहेत.

पुण्याच्या रश्मी ऊर्ध्वरेषे यांना मिळाला ‘नारीशक्ती’ पुरस्कार
होळीच्या दुसऱ्या दिवशी धुळवड खेळण्याची परंपरा आहे. होळीची राख अंगाला लावणे हे चांगले असल्याचे सांगितले जाते. त्या वेळी अनेकजण रंग खेळत असल्याने बाजारात विविध रंग विक्रीसाठी आले आहेत.