Baramati: अवैद्य व्यवसायिकांचा उत्पादन शुल्क विभागाच्या गाड्या फोडल्या; पोलिस पथकावरही हल्ला

baramati
baramatisakal

Baramati: बारामती-दौंड तालुक्यातील माळेगाव येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी रात्रीच्यावेळी अवैद्य व्यावसायिकांवर कारवाई केली. त्याचा राग मनात धरून संशयित धनगर व गव्हाणे कुटुंबियांच्या ८ ते १०  लोकांनी संबंधित विभागाच्या पोलिसांवर हल्ला करीत शिवीगाळ व दमदाटी केली. या शिवाय संशियतांनी सरकारी व खाजगी अशा दोन चारचाकी गाड्या फोडल्या.

baramati
Thane Crime: हॉटेलमध्ये जेवणाची ऑर्डर उशिरा आल्याने घातला धिंगाणा केला; चॉपरने हल्ला

गुरुवार (ता.२३) रोजी रात्री साडेआकराच्या सुमारास वरील घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच माळेगाव पोलिस ठाण्याचे अधिकचे पोलिस तातडीने वरील घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. आक्रमक जमावाला शांत करण्यासाठी माळेगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षिक देविदास साळवे आदींनी प्रय़त्न केले. याचवेळी गव्हाणे व धनगर कुटुंबियांनी उत्पादन शुल्क विभागाच्या पोलिसांनी रात्रीच्यावेळी आमच्या घरी येऊन गरोदर महिलांसह मुलाबाळांना मारहान केली, असा आरोप केला.

त्या कुटुंबियांनी एकत्रीत येत माळेगाव पोलिस ठाण्यात ठिय्या मांडला. आरडाओरडा केला. रात्रीच्यावेळी हा गोंधळ झाल्याने गावात एकच खळबळ उडाली. परिणामी अनेकांनी पोलिस ठाण्याकडे धाव घेत गर्दी केली होती.

baramati
Chhatrapati Sambhajinagar Crime : लग्नाच्या आमिषाने भावाच्या मित्राचा अत्याचार; आरोपी अटकेत

दरम्यान, बारामती-दौंड तालुक्यातील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्तरित्या माळेगाव येथे अवैद्य व्यवसायिकांवर कारवाई केली. ही कारवाई केल्याचा राग मनात धरून धनगर व गव्हाणे कुटुंबियांनी सरकारी कामात अडथळा आणला व आक्रमक भूमिका घेत त्यांनी सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर दगडाने हल्ला केला. हाताने माराहाण केली, सरकारी गाड्या फोडल्या, अशी तक्रार राज्य उत्पादन शुल्क निरिक्षक विजय वसंतराव रोकडे यांनी फिर्य़ादीमध्ये नमूद केली.

या फिर्यादीच्या आधारे माळेगाव पोलिसांनी किशोर जनार्धन घनगर, पिंटू गव्हाणे यांच्यासह ८ ते १० लोकांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. त्यामध्ये सरकारी कामात अडथळा आणणे, अधिकारी कर्मचाऱ्यांना मारहाण करीत शिवीगाळ व दमदाटी करणे, सरकारी गाड्या फोडून नुकसान करणे, दहशत पसरवणे आदी कलमांचा समावेश आहे, अशी माहिती सहाय्यक पोलिस अधिकारी देविदास सावळी यांनी दिली.

baramati
Jalgaon Crime: 2 दुचाकींवर आले 6 चोरटे.. 23 मिनिटांत 11 लाखांचे सोने लंपास; चौक्यांसह कॅमेरे नावालाच

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com