बारामतीकरांचा 'ब्रेक द चेन'ला 100 टक्के प्रतिसाद

भिगवण, इंदापूर, गुनवडी, गांधी चौकासह कसबा, बसस्थानक परिसरात आज शुकशुकाट
Baramati Corona Break the chain
Baramati Corona Break the chainMilind Sangai

बारामती : शासनाने लागू केलेल्या 'ब्रेक द चेन'च्या आवाहनाला आज बारामतीकरांनी आज शंभर टक्के प्रतिसाद दिला. अत्यावश्यक सेवा, वैद्यकीय कारणांव्यतिरिक्त आज कोणीही रस्त्यावर आले नाही. शहरातील भिगवण, इंदापूर, गुनवडी, गांधी चौकासह कसबा, बसस्थानक परिसरात आज शुकशुकाट होता. तुरळक दुचाकी व चार चाकी वाहनांची आज वर्दळ दिसली. शहरातील सर्वच प्रमुख चौकांमध्ये पोलिस व होमगार्ड प्रत्येकाला थांबवून चौकशी करत होते. गेल्या लॉकडाऊनच्या तुलनेत अधिक जागृती झालेली असल्याने लोकांनीच आज घराबाहेर पडणे टाळले, त्या मुळे पोलिसांवरही आज फारसा ताण नव्हता. किराणा, बेकरी, दूध विक्रीच्या दुकानात अभावानेच ग्राहक दिसत होते.

Baramati Corona Break the chain
पुणे तिथे काय उणे! ज्यांच्या घरी चोरी केली त्यांच्याबरोबरच चोरटा गेला सहकुटुंब जेवायला
Baramati Corona Break the chain
पुणेकरांनो, काळजी करू नका! फळे, भाजीपाला मिळणार

स्वॅब तपासणी, रुग्णांना डबा देणे, औषध आणणे, दवाखान्यात तपासणीला जाणा-यांचीच संख्या आज लक्षणीय होती. आज पहिल्या दिवशी बारामतीत पोलिसांना कोठेही बळाचा वापर अजिबातच करावा लागला नाही, लोकांनीच समजूतदारपणा दाखवल्याचे आजचे चित्र होते. दरम्यान बारामतीतील व्यापा-यांनीही शासनाच्या आवाहनाला शंभर टक्के प्रतिसाद देत आपापली दुकाने बंद ठेवली आहेत. बारामतीत कोरोना रुग्णांचा आकडा दैनंदिन तीनशेचा टप्पा पार करत असल्याने ही साखळी तोडण्याच्या प्रक्रीयेत व्यापारीही सरकारला मदत करण्याच्याच भूमिकेत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com