esakal | बारामतीकरांची यंदा टॅंकरमधून सुटका
sakal

बोलून बातमी शोधा

Water-Tanker

वरुणराजाने यंदा कृपा केल्यामुळे बारामती तालुक्यातील उन्हाळा सुखकर होईल, असे आज चित्र आहे. यंदा तालुक्यातील सर्व ओढे, नाले, बंधारे भरून वाहत आहेत. त्यामुळे सर्व तलाव तुडुंब भरल्याने उन्हाळ्यात टँकरची गरज भासणार नाही, असा प्रशासनाला विश्वास वाटत आहे.

बारामतीकरांची यंदा टॅंकरमधून सुटका

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पावसाने गाठली सरासरी; तालुक्यातील सर्व बंधारे, तलाव तुडुंब   
बारामती - वरुणराजाने यंदा कृपा केल्यामुळे बारामती तालुक्यातील उन्हाळा सुखकर होईल, असे आज चित्र आहे. यंदा तालुक्यातील सर्व ओढे, नाले, बंधारे भरून वाहत आहेत. त्यामुळे सर्व तलाव तुडुंब भरल्याने उन्हाळ्यात टँकरची गरज भासणार नाही, असा प्रशासनाला विश्वास वाटत आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

बारामती तालुक्यातील सर्वच महसूल मंडलामध्ये यंदा पावसाने सरासरी गाठली आहे. यंदापासून राज्य सरकारने बारामती तालुक्याच्या पर्जन्यमानाच्या सरासरीमध्ये वाढ केल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी दत्तात्रेय पडवळ यांनी दिली. 

राज्यातील पोलीस भरती जाहीर; भरती प्रक्रिया नेमकी कशी असणार याबाबत उमेदवार संभ्रमात

गतवर्षापर्यंत बारामतीची सरासरी ४५० मि.मी. इतकी गृहीत धरण्यात येत होती, यंदापासून ही सरासरी ५४०.४० मि.मी. इतकी निश्चित केली आहे. 
गेल्या पावसाळ्यात बारामती तालुक्यात ६४३ मि.मी. पावसाची नोंद झाली होती. त्यामुळे यंदाच्या उन्हाळ्यातही बारामतीत एकही टँकर लागला नाही. यंदाही पावसाची वाटचाल त्याच दिशेने सुरू आहे. त्यामुळे पुढील उन्हाळ्यातही टँकरपासून तालुक्याला दिलासा मिळेल, अशी चिन्हे आहेत. 

एका रात्रीत तीन वेगवेगळ्या अपघातात आठ जणांचा मृत्यू; कोठे ते वाचा

चारही जिरायत मंडलांवर कृपा 
बारामतीत गतवर्षात ४९ टँकरने ३३ गावे व ३६१ वाड्यावस्त्यांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला होता. मात्र, यंदाच्या उन्हाळ्यात टँकरची गरज भासली नाही. जनाई शिरसाईचे तलाव भरलेले असून, नाझरे धरणही तुडुंब भरलेले 
आहे. तसेच, सर्वच ठिकाणचे तलाव, ओढे नाले व जलसंधारणाची कामे तुडुंब भरून वाहत आहेत. विहिरींच्या पाण्याची पातळी लक्षणीय वाढली आहे. हे पाणी आता बराच काळ टिकेल, असा अंदाज आहे. अजूनही पावसाने उसंत घेतलेली नाही. लोणी भापकर, सुपे, मोरगाव व उंडवडी या चारही जिरायत मंडलांत उत्तम पाऊस झाला आहे.

शाळा प्रवेशाचे वय कमी करण्याचा निर्णय चिंता वाढविणारा

तालुक्यातील मंडलनिहाय पाऊस (मि.मी.मध्ये)
बारामती - ५३२.७०,  माळेगाव - ५०१.९०,  पणदरे - ५५०.४०, वडगाव निंबाळकर - ६६४.१०, लोणी भापकर - ८०६.६०, सुपे - ६९७.४०, मोरगाव - ६१७.२०, उंडवडी सुपे - ५१९.७०.

बारामती तालुक्यात यंदा पाऊसकाळ चांगला झाल्याने आगामी उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची गरज भासणार नाही. सर्व जलसंधारणाच्या कामातही पाणी चांगले टिकून आहे. तलाव व विहिरी भरलेल्या असल्याने पाण्याची स्थिती चांगली आहे.
 - राहुल काळभोर, गटविकास अधिकारी, बारामती

Edited By - Prashant Patil