Baramati News : पाच वर्षात पाच लाख वीजजोडण्या करत बारामतीचा विक्रम

परिमंडलाचे मुख्य अभियंता सुनिल पावडे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘एक दिवस, एक गाव’, ‘मागेल त्याला कनेक्शन’ अशा विविध मोहिमा वेळोवेळी व यशस्वीपणे राबविल्याने हे उत्तुंग यश साध्य झाले आहे. परिणामी महावितरणच्या महसूलात घसघशीत वाढ झाली आहे.
baramati
baramatisakal

बारामती : 23 एप्रिल 2019 ते डिसेंबर 2023 या पाच वर्षांच्या काळात महावितरणच्या बारामती परिमंडलाने तब्बल 5 लाख 2 हजार 916 इतक्या विक्रमी वीज जोडण्या दिल्या. यात कृषीच्या 1 लाख 9 हजार 72 वीजजोडण्यांचा समावेश आहे. परिमंडलाचे मुख्य अभियंता सुनिल पावडे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘एक दिवस, एक गाव’, ‘मागेल त्याला कनेक्शन’ अशा विविध मोहिमा वेळोवेळी व यशस्वीपणे राबविल्याने हे उत्तुंग यश साध्य झाले आहे. परिणामी महावितरणच्या महसूलात घसघशीत वाढ झाली आहे.

बारामती परिमंडलात पुणे जिल्ह्यातील बारामती, इंदापूर, दौंड, शिरुर, पुरंदर व भोर तालुके तर सातारा व सोलापूर हे जिल्हे येतात. सुनिल पावडे यांनी परिमंडलाचा पदभार घेतल्यापासूनच ग्राहकाभिमुख सेवेला महत्व दिले. ग्राहकाला वेळेत वीज जोडणी दिली, त्याचे बिलींग अचूक केले तर ग्राहक पैसे भरण्यास मागेपुढे पाहत नाही हा विश्वास त्यांना होता. त्यामुळे श्री. पावडे यांनी योग्य नियोजन केले. गावागावात कॅम्प लावून वीज जोडण्या दिल्या. मार्च 2019 अखेरीस परिमंडलाची ग्राहक संख्या सुमारे 24 लाख 89 हजार 942 इतकी होती. डिसेंबर 2023 अखेरीस ग्राहक संख्येत 20 टक्के वाढ झाली, हे विशेष.

baramati
Baramati News : मुख्यमंत्री सक्षम शहर स्पर्धेत पुणे विभागात बारामती अव्वल

गेल्या चार वर्षात 5 लाख 2 हजार 916 वीज जोडण्या देण्याचे काम झाले आहे. यामध्ये कृषीच्या 1 लाख 9 हजार 72 तर बिगरशेतीच्या 3 लाख 93 हजार 844 वीजजोडण्यांचा समावेश आहे.

30 मीटर अंतरातील कृषी जोडणी तत्काळ

ज्या शेतकऱ्यांच्या विहीरीचे किंवा बोअरवेलचे अंतर महावितरणच्या अस्तित्वात असलेल्या वीज यंत्रणेपासून 30 मीटरच्या आत आहे, त्यांना 24 तासात कनेक्शन देण्याचे काम सुरु आहे. या अंतरातील प्रलंबित वीज जोडण्यांची संख्या शून्यावर आहे. नव्याने ज्यांना ३० मीटरच्या आतील जोडणी हवी असेल त्या शेतकऱ्यांनी स्थानिक कार्यालयाशी संपर्क साधून अर्ज करावा.

baramati
Baramati News : औद्योगिक वीज जोडणीचा खर्च आता महावितरण करणार - सुनिल पावडे

सोमेश्वर उपविभागाची नेत्रदिपक कामगिरी

बारामती तालुक्यातील सोमेश्वर उपविभागाची वाटचाल दोन पावले पुढे आहे. उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता संतोष चव्हाण यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन 5 हजारांहून अधिक जोडण्या तपासल्या. 1200 अनधिकृत आकडे काढून त्यांना वीजजोडणी घेण्यास प्रवृत्त केले. 288 शेतीपंपाची प्रत्यक्ष अश्वशक्तीनुसार नोंद केली. ज्यामुळे वाढीव 5610 अश्वशक्तीचा भार अधिकृतपणे यंत्रणेत आला. सर्व्हेक्षणामुळे 1368 घरगुती कनेक्शन वाढले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com