त्याने मैत्रीणीसमोरच विचारले, तुला पगार किती? मग काय...

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 जानेवारी 2020

अँथोनी अर्मस्वामी हा त्याच्या मैत्रीणीसमवेत येरवड्यातील सिटी चौकात असलेल्या एका हॉटेलमध्ये बसला होता. यावेळी फिर्यादीने अँथोनीला तु कुठे काम करतोस ? तुला किती पगार आहे, अशी विचारणा केला. मैत्रीणीसमोरच पगाराचा विषय काढल्यामुळे अँथोनी संतप्त झाला.

पुणे : हॉटेलमध्ये मैत्रीणीसमवेत बसलेल्या तरुणास एकाने पगार किती अशी विचारणा केली. त्यामुळे संतप्त झालेल्या तरुणासह त्याच्या मित्रांनी पगार विचारणाऱ्याला लोखंडी पाईपाने जबर चोप दिला. ही घटना येरवड्यातील शास्त्रीनगर चौकामध्ये नुकतीच घडली. 

फुकट जेवणासाठी हॉटेल व्यवसायिकास धमकी: म्हणे, तेरी मुंडी अलग करके.....
 

रोहीत मोरे, रॉनी अर्मस्वामी, अँथोनी अर्मस्वामी (दोघेही रा. वडगाव शेरी), नानू (रा. ताडीवाला रोड) अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी निलेश शांताराव देशमुख (वय 28, रा. वडगाव शेरी) याने येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

तरुणाने मागितला मुलीचा नंबर अन् पुणे पोलिसांनी दिले 'हे' उत्तर
 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अँथोनी अर्मस्वामी हा त्याच्या मैत्रीणीसमवेत येरवड्यातील सिटी चौकात असलेल्या एका हॉटेलमध्ये बसला होता. यावेळी फिर्यादीने अँथोनीला तु कुठे काम करतोस ? तुला किती पगार आहे, अशी विचारणा केला. मैत्रीणीसमोरच पगाराचा विषय काढल्यामुळे अँथोनी संतप्त झाला.

पुणे : पोलिसांनी वाचला वृद्धाश्रमाचा बोर्ड अन्...

काही वेळाने अँथोनीने त्याच्या मित्रांना बोलावून घेतले. त्यांनी फिर्यादीस शास्त्रीनगर चौकात गाठले. त्यास लोखंडी पाईपाने मारहाण केली. या घटनेमध्ये फिर्यादीच्या पाठीवर, हातावर व पायावर जबर मार बसला आहे.  

पुणे : डोक्यात फरशी घालून तरुणाचा खून करणाऱ्या 2 आरोपींना अटक 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Beating boy due to asking about salary in front of girlfriend in Pune

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: