फुकट जेवणासाठी हॉटेल व्यवसायिकास धमकी: म्हणे, तेरी मुंडी अलग करके.....

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 जानेवारी 2020

रितेश हा अल्पवयीन असताना त्याच्यावर दोन गुन्हे दाखल आहेत. तेव्हापासूनच तो संबंधीत हॉटेलमध्ये येऊन फुकट जेवण करत होता. जेवण झाल्यानंतर पैसे न देता हॉटेलचा मालक व कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालत असे

पुणे : दररोज फुकट जेवण करण्याबरोबरच दरमहा पाच हजार रुपयांचा हफ्ता मागणाऱ्यास विरोध दर्शविणाऱ्या हॉटेल व्यावसायिकास मोबाईलवर रेकॉर्डींग करुन जीवे मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी एका तरुणाला अटक करण्यात आली आहे. 

तरुणाने मागितला मुलीचा नंबर अन् पुणे पोलिसांनी दिले 'हे' उत्तर
 

रितेश विशाल पवार (वय 19, रा. वडगाव शेरी) असे पोलिसांनी अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी 41 वर्षीय हॉटेल व्यावसायिकाने येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

अभ्यासानंतरच ‘बीआरटी’ धावणार! 
 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे वडगाव शेरी येथे नेहा नावाचे हॉटेल आहे. रितेश हा अल्पवयीन असताना त्याच्यावर दोन गुन्हे दाखल आहेत. तेव्हापासूनच तो संबंधीत हॉटेलमध्ये येऊन फुकट जेवण करत होता. जेवण झाल्यानंतर पैसे न देता हॉटेलचा मालक व कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालत असे. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी हॉटेल मालकही त्याकडे दुर्लक्ष करीत असे. मात्र त्याचा त्रास वाढू लागल्याने हॉटेल मालकाने त्यास जेवण देण्यास टाळाटाळ करण्यास सुरूवात केली. त्याचा राग मनात धरून त्याने फिर्यादीस फुकट जेवणाबरोबरच दरमहा पाच हजार रुपये हफ्ता देण्याची तसेच हफ्ता न दिल्यास स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतुन जाळून घेण्याची धमकीही दिली.

पुणे : पोलिसांनी वाचला वृद्धाश्रमाचा बोर्ड अन्...

दरम्यान, शनिवारी रितेश फिर्यादीच्या हॉटेलमध्ये पुन्हा आला. त्यावेळी फिर्यादी हॉटेलमध्ये नव्हते. त्यामुळे त्याने हॉटेलमधील कर्मचाऱ्याचा मोबाईल घेतला. त्यामध्ये चित्रीकरण करून फिर्यादी यांना शिवीगाळ केली. तसेच 'जिस दिन तु मुझे मिलेगा, उस दिन तेरी मुंडी अलग करके पोलिस स्टेशन भेजुंगा' अशी धमकी दिली. हॉटेलच्या कर्मचाऱ्याने हा व्हिडीओ फिर्यादी यांना दाखविला. त्यानंतर फिर्यादी यांनी पोलिस ठाणे गाठले. 

पुणे : डोक्यात फरशी घालून तरुणाचा खून करणाऱ्या 2 आरोपींना अटक 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Young man arrested for Threatening to hotel businessmen for free dining In Pune