esakal | Video : शरद पवारांना पुण्यातून पाठविली जाणार २५ हजार पत्र; वाचा कोण पाठवणार ही पत्र?
sakal

बोलून बातमी शोधा

Sharad_Pawar

अयोध्येत राम मंदिर बांधून कोरोना जाणार आहे का, असा प्रश्न पवार यांनी उपस्थित केला होता. त्याच्या निषेधार्थ राज्यातून दहा लाख पत्र पवार यांच्या निवासस्थानी पाठविण्याचा संकल्प भाजयुमोचे प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील यांनी केला आहे.

Video : शरद पवारांना पुण्यातून पाठविली जाणार २५ हजार पत्र; वाचा कोण पाठवणार ही पत्र?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजनाबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी (ता.२४) आंदोलन केले. पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानी पुण्यातून जय श्रीराम लिहिलेली २५ हजार पत्र पाठविण्यात येणार असल्याचे भाजयुमोतर्फे यावेळी सांगण्यात आले. 

लॉकडाऊन संपला अन् पुण्यातील रस्त्यांवर वर्दळ झाली सुरू​

अयोध्येत राम मंदिर बांधून कोरोना जाणार आहे का, असा प्रश्न पवार यांनी उपस्थित केला होता. त्याच्या निषेधार्थ राज्यातून दहा लाख पत्र पवार यांच्या निवासस्थानी पाठविण्याचा संकल्प भाजयुमोचे प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील यांनी केला आहे. त्यानुसार पुण्यात भाजयुमोचे शहराध्यक्ष आणि नगरसेवक दीपक पोटे यांच्या नेतृत्त्वाखाली लक्ष्मी रस्त्यावर सिटी पोस्ट चौकात शुक्रवारी दुपारी आंदोलन करण्यात आले. त्यावेळी पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानी पुण्यातून जय श्रीराम लिहिलेली २५ हजार पत्र पाठविण्यात येणार असल्याचे पोटे यांनी जाहीर केले.

या प्रसंगी प्रदीप गावडे, राजेश येनपुरे, प्रमोद कोंढरे, निहाल घोडके, चंद्रकांत पोटे, अजय भोकरे, प्रतीक देसरडा, बाप्पू मानकर, सुनील मिश्रा, अभिजीत राऊत, दीपक पवार, दिलीप राखपसरे, राजू परदेशी, दुष्यांत मोहोळ, अपूर्व खडे, अपर्णा लोणारे, आदी उपस्थित होते.  

कोरोनामुळे थांबले 'देणाऱ्यांचे हजारो हात'; सामाजिक संस्थांची झाली 'दुबळी झोळी!'​

यावेळी पोटे म्हणाले, राम मंदिराबाबत सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निकाल दिला आहे. त्यामुळे अयोध्येत ५ ऑगस्ट रोजी राममंदिराचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. त्यामुळे देशात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. परंतु, पवार यांनी वादग्रस्त विधान करून समस्त रामभक्तांच्या भावना दुखावल्या आहेत. त्याचा निषेध करण्यासाठी राज्यभर अशा प्रकारचे आंदोलन करण्यात येत आहे. पिंपरी चिंचवडमधूनही सुमारे २० हजारपेक्षा जास्त पत्र पवार यांच्या निवासस्थानी पाठविण्यात येणार आहे. या प्रसंगी प्रातिनिधीक पत्र सिटी पोस्टच्या पोस्ट बॉक्समध्ये पाठविण्यात आली.

या तरुणाचे करावे तेवढे कौतुक कमीच, अडीच वर्षात 20 वेळा प्लेटलेट्सचे दान​ 

अयोध्येतील राममंदिर न्यायालयाच्या आदेशानुसारच बांधले जाणार आहे. त्यासाठी देशातील रामभक्त वर्गणी काढणार आहेत. तरीही राममंदिराबाबत नकारात्मक भावना काही नेते व्यक्त करीत आहेत, ही बाब चांगली नाही. अशा प्रवृत्तींचा यावेळी आपण सर्वांनी एकत्र येऊन निषेध केला पाहिजे, असेही पोटे यांनी म्हटले आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

loading image
go to top