'कोविड-19'च्या संशोधनासाठी वापरणार 'सीएसआर' फंड; 'बीरेक'चा निर्णय!

सकाळ वृत्तसेवा
Friday, 17 April 2020

प्रस्ताव पाठविण्यासाठी अंतिम मुदत 15 मे पर्यंत आहे. आतापर्यंत 463 प्रस्ताव विभागाकडे दाखल झाले आहेत.

पुणे : कोरोनाच्या संसर्गावर मात करण्यासाठी औषधासंबंधीच्या संशोधनाची गती वाढविणे गरजेचे आहे. त्यासाठी आर्थिक तरतुदी बरोबरच संशोधक आणि उत्पादक यांमधील परस्पर सहकार्यही वाढवावे लागणार आहे.

देशाच्या जैवतंत्रज्ञान विभागाअंतर्गत येणाऱ्या 'बायोटेक्‍नॉलॉजी इंडस्ट्रीज रिसर्च असिस्टंट कौन्सिल'च्या (बीरेक) वतीने सामाजिक उत्तरदायित्व निधीचा (सीएसआर) संशोधनासाठी वापर करण्याचे निश्‍चित करण्यात आले आहे. तसेच, संशोधन प्रस्तावही मागविण्यात आले आहे. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

'कोविड-19'साठी औषध शोधन्यापासून इतर वैद्यकीय साहित्याच्या निर्मितीपर्यंत मूलभूत संशोधनाची आवश्‍यकता आहे. त्यात विदेशातून साहित्य आयात करणे शक्‍य नसल्यामुळे स्वदेशी संशोधनाला प्रोत्साहन देणे आणि त्याची गती वाढविणे अनिवार्य झाले आहे. वेळेची मागणी लक्षात घेत कौंसीलच्या वतीने हा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना संदर्भातल्या महत्त्वपूर्ण आणि गुंतागुंतीच्या प्रश्‍नांची उत्तरे वेळेत शोधणे आता आवश्‍यक झाले आहे. 

- 'धमक्यांना घाबरायला मी झायरा वसीम नाही'; बबिता फोगटचे जोरदार प्रत्युत्तर

संशोधनाचे प्रस्ताव 

देशभरातून कोविड संदर्भातील संशोधनाचे प्रस्ताव मागविण्यात आले आहे. त्यांची वैज्ञानिक सत्यता आणि उपयुक्तता बघून पुढील कार्यवाही साठी निवड करण्यात येणार आहे. प्रस्ताव पाठविण्यासाठी अंतिम मुदत 15 मे पर्यंत आहे. आतापर्यंत 463 प्रस्ताव विभागाकडे दाखल झाले आहेत. पुढील प्रकारातील संशोधनाचे प्रस्ताव कौंसीलकडे पाठविण्यात यावे.

रतन टाटा यांना 'भारतरत्न' पुरस्कार द्या...

1) निदान : कोविड -19 च्या संसर्गाचे जलद गतीने निदान करणारे तंत्रज्ञान, एखादा भाग, संपूर्ण संच यांचे संशोधन. तसेच, निदानाच्या पद्धतीतील संशोधन 

2) लसीकरण : कोरोनावरील औषध किंवा प्रतिजैविक विकसित करणारे मूलभूत संशोधन, त्याची पद्धत, उत्पादनाचे तंत्रज्ञान आदीसंबंधीचे प्रस्ताव. 

4) उपचार पद्धती : कोरोनाच्या उपचारासाठी योग्य आणि प्रभावी पद्धत, त्यासंबंधीच्या सूचना आणि निरीक्षणे. तसेच, प्राण्यांवर किंवा जीवाणूंवर करावयाच्या संशोधनाचे प्रस्ताव 

5) उपचारासाठीची औषधे : उपलब्ध औषधांचा कोरोनाच्या उपचारासाठी प्रभावी असल्यास त्यासंबंधीचे संशोधनाचे प्रस्ताव. या प्रस्तावानी कोविड-19 संदर्भातील आदर्श नियमांचे पालन करणे आवश्‍यक आहे.

- भाडेकरूंना मोठा दिलासा, पुढील तीन महिने भाडं पुढे ढकलण्याच्या घरमालकांना सूचना


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BIRAC decided that CSR fund will be used for Covid 19 research