गरीब लोकांना दूध वाटप करीत रास्तारोको करुन भाजपचे सासवडमध्ये आंदोलन

दत्ता भोंगळे
रविवार, 2 ऑगस्ट 2020

सासवड (ता. पुरंदर) येथील जनसेवा चौकात सासवड शहर भारतीय जनता पार्टीच्यावतीने शेतकऱ्यांना दुधाचा भाव मिळावा. यासाठी आंदोलनात शासनाच्या निषेधार्थ घोषणा देण्यात आल्या. 

गराडे :  सासवड येथे गोमातेचे पूजन व  शहरातील गरीब लोकांना दूध वाटप करून रास्तारोको करीत आंदोलन छेडले. पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष गणेश भेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सासवड ( ता. पुरंदर ) येथील जनसेवा चौकात सासवड शहर भारतीय जनता पार्टीच्यावतीने शेतकऱ्यांना दुधाचा भाव मिळावा यासाठी आंदोलनात शासनाच्या निषेधार्थ घोषणा देण्यात आल्या.

 ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

यावेळी पोलीस निरीक्षक डी. एस. हाके, सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल घुगे, तालुकाध्यक्ष आर. एन. जगताप, शहराध्यक्ष साकेत जगताप, उपाध्यक्ष अमोल जगताप, सासवड शहर युवक अध्यक्ष आनंद जगताप, कार्याध्यक्ष निलेश जगताप, वकील विश्वास पानसे, ऋतुजा जाधव, नदीम इनामदार समीर कामत, श्रीकांत ताम्हणे, माजी तालुका अध्यक्ष बाळासाहेब चव्हाण व सासवड शहरातले पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

दुधासाठी दहा रुपये अनुदान व दूध पावडर बुट्टी पन्नास रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करावे म्हणून आंदोलन करण्यात आल्याचे शहराध्यक्ष साकेत जगताप यांनी सांगितले. 

-पुणे विद्यापीठाचा आणखी एक करार; विद्यार्थ्यांना संशोधनाची संधी!

''शेतकऱ्याला दुधाचा बाजार भाव मिळत नसल्यामुळे तसेच लॉकडाऊनमध्ये विक्रीवर परिणाम झाला आहे. या सर्व बाबीमुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्याची सोडवणूक करायची असेल तर आपल्याला शेतकऱ्यांच्या दुधाला बाजार भाव दिला पाहिजे. हे शासन आंदोलन करूनही झोपेचे सोंग घेत आहे. म्हणून पुन्हा पुन्हा आंदोलन केले जात आहेत. शेतकऱ्याला कोणताही पक्ष नसतो  त्यामुळे शासनाने तातडीने लक्ष घालून शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा'' अशी मागणी सासवड नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष  व भाजपचे तालुकाध्यक्ष आर. एन. जगताप यांनी केली.

 डिप्लोमाच्या प्रवेशाला मुहूर्त सापडेना; वेळापत्रकाकडे लागले विद्यार्थ्यांचे लक्ष!

''तालुक्यात सत्तेतील पक्ष शेतकऱ्यांची बाजू लक्षात घेत नाहीत. आज शेतकऱ्यांना दुधाचा दर वाढवून त्यांना न्याय दिलाच पाहिजे. हे आमचे म्हणणे आहे''असे भाजपचे कार्याध्यक्ष निलेश जगताप यांनी सांगितले.

परीक्षा घेताना 'एमपीएससी'चीच लागणार कसोटी; उमेदवारांसाठी घेतला 'हा' निर्णय!​


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP agitation at Saswad to get hike milk price to farmers