कसबा : पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक झाल्या आमदार | Election Results 2019

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 ऑक्टोबर 2019

पुण्यातील सर्वाधिक लक्ष असलेला मतदारसंघ आणि पुण्याचे मध्यवर्ती असलेल्या कसबा मतदारसंघातून भाजपच्या मुक्ता टिळक विजयी झाल्या आहेत. 

पुणे : पुण्यातील सर्वाधिक लक्ष असलेला मतदारसंघ आणि पुण्याचे मध्यवर्ती असलेल्या कसबा मतदारसंघातून भाजपच्या मुक्ता टिळक विजयी झाल्या आहेत. 28 हजार मतांनी त्या विजयी झाल्या. त्यांच्या विरूद्ध काँग्रेसचे अरविंद शिंदे व मनसेचे अजय शिंदे रिंगणात होते. टिळक यांना 75 हजार मतं मिळाली, तर शिंदे यांना 27 हजार मतं मिळाली आहेत. 

भाजपचे गेली 25 वर्षे आमदार असलेले व जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांची मे महिन्यात खासदार म्हणून निवड झाल्यानंतर, भाजपने महापौर मुक्ता टिळक यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविले. त्यांच्याविरोधात कॉंग्रेसचे नगरसेवक अरविंद शिंदे, मनसेचे शहरप्रमुख अजय शिंदे निवडणूक लढवित आहेत. शिवसेनेचे नगरसेवक विशाल धनावडे यांनी बंडखोरी करून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतल्याने, कसबा पेठ मतदारसंघातील मुख्य लढत चौरंगी झाली आहे. 

पुण्यात जमावबंदी; कोल्हापूरात मिरवणूकांना बंदी | Election Results 2019

निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात या मतदारसंघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा झाली. पुण्यातील भाजपच्या सर्व उमेदवारांच्या प्रचारासाठी ही सभा होती. मनसेचे नेते राज ठाकरे यांनी या मतदारसंघात जाहीर सभा घेतली. 

मुक्ता टिळक या गेली साडेसतरा वर्षे या भागातून भाजपच्या नगरसेविका आहेत. अरविंद शिंदे यांनीही महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष, विरोधी पक्षनेते ही पदे भुषविली आहेत. 

पुण्याच्या निकालाकडे राज्याचे लक्ष; या आहेत बिग फाईट! | Election Results 2019

भाजपच्या उमेदवारांनी 1978 पासून झालेल्या निवडणुकीत 1985 चा अपवाद वगळता या मतदारसंघातून विजय मिळविला. जनता पक्ष व भाजप यांच्यातर्फे अरविंद लेले, भाजपचे अण्णा जोशी, कॉंग्रेसचे उल्हास काळोखे यांनी कसबा पेठ मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले. 1992 च्या पोटनिवडणुकीत कॉंग्रेसचे वसंत थोरात यांनी बापट यांचा पराभव केला होता. बापट 1995 पासून सलग पाच निवडणुकांत विजयी झाले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP Candidate Mukta Tilak won from Kasba Vidhansabha Constituency