पुण्याचे महापौर आणि उपमहापौरपद भाजपकडेच

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 नोव्हेंबर 2019

महापौरपद खुल्या गटासाठी (सर्वसाधारण) आरक्षित आहे. या पदावर विराजमान होण्यासाठी सत्ताधारी भाजपमधील इच्छुकांत चढाओढ लागल्याची पाहायला मिळाली. विधानसभा निवडणुकीत पक्षानेच हुलकावणी दिल्याने अनेकजणांनी फिल्डिंग लावली होती. मात्र, राज्यातील सत्तेच्या नव्या समीकरणांच्या पार्श्‍वभूमीवर अभ्यासू आणि अनुभवी नगसेवकाला या पदावर संधी मिळेल, असे. पक्षाच्या वर्तुळातून सांगण्यात आले होते. त्यानुसार मोहोळ यांना ही संधी दिली आहे. 

पुणे : पुण्याचे नवे महापौर म्हणून नगरसेवक मुरलीधर मोहोळ यांचे नाव निश्चित झाले आहे. तर, उपमहापौरपदही भाजपकडे राहणार असून, या पदाची माळ भाजपने नगरसेविका सरस्वती शेंडगे यांच्या गळ्यात घातली आहे. 

पुण्याचे नवे महापौर मुरलीधर मोहोळ 
महापौरपद खुल्या गटासाठी (सर्वसाधारण) आरक्षित आहे. या पदावर विराजमान होण्यासाठी सत्ताधारी भाजपमधील इच्छुकांत चढाओढ लागल्याची पाहायला मिळाली. विधानसभा निवडणुकीत पक्षानेच हुलकावणी दिल्याने अनेकजणांनी फिल्डिंग लावली होती. मात्र, राज्यातील सत्तेच्या नव्या समीकरणांच्या पार्श्‍वभूमीवर अभ्यासू आणि अनुभवी नगसेवकाला या पदावर संधी मिळेल, असे. पक्षाच्या वर्तुळातून सांगण्यात आले होते. त्यानुसार मोहोळ यांना ही संधी दिली आहे. 

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

या पदासाठी येत्या 22 नोव्हेंबरला निवडणूक होणार आहे. त्यासाठी आज (सोमवारी) अर्ज भरण्यात येणार आहेत. महापालिकेत भाजपकडे 99 नगरसेवक आहेत. त्यामुळे महापौरपदासह सर्व पदाधिकारी भाजपचेच आहेत. आता उपमहापौरपदही भाजपकडेच राहिले आहेत. उपमहापौरपदावरून अडून बसलेल्या ‘आरपीआय’ आणि भाजपमधील चर्चे दरम्यान गोंधळ पाहायला मिळाला. आमदार माधुरी मिसाळ आणि संजय काकडे यांनी आरपीआयच्या नेत्यांशी चर्चा केली. त्यानंतर शेंडगेंच्या नावावर शिक्कामोर्तब झाले.
पर्याय सर्वपक्षीय संयुक्त सरकारचा 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP has the Pune Mayor and Deputy Mayor post