पुण्याचे नवे महापौर मुरलीधर मोहोळ

Murlidhar Mohol
Murlidhar Mohol

पुणे : पुण्याचे नवे महापौर म्हणून नगरसेवक मुरलीधर मोहोळ यांचे नाव निश्चित झाले आहे. तर, उपमहापौरपदाची माळ अद्याप कोणाच्या गळ्यात पडलेली नाही.

महापौरपद खुलया गटासाठी (सर्वसाधारण) आरक्षित आहे. या पदावर विराजमान होण्यासाठी सत्ताधारी भाजपमधील इच्छुकांत चढाओढ लागल्याचे पाहायला मिळत आहे. विधानसभा निवडणुकीत पक्षानेच हुलकावणी दिल्याने अनेकजणांनी फिल्डिंग लावली होती. मात्र, राज्यातील सत्तेच्या नव्या समीकरणांच्या पार्श्‍वभूमीवर अभ्यासू आणि अनुभवी नगसेवकाला या पदावर संधी मिळेल, असे. पक्षाच्या वर्तुळातून सांगण्यात आले होते. त्यानुसार मोहोळ यांना ही संधी दिली आहे.

या पदासाठी येत्या 22 नोव्हेंबरला निवडणूक होणार आहे. त्यासाठी सोमावारी अर्ज भरण्यात येणार आहेत. महापालिकेत भाजपकडे 99 नगरसेवक आहेत. त्यामुळे महापौरपदासह सर्व पदाधिकारी भाजपचेच आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com