भाजपचा राष्ट्रवादीच्या मंत्र्यावर सर्जिकल स्ट्राईक

indapur bjp
indapur bjp

भिगवण (पुणे) : इंदापूर तालुक्यातील भिगवण येथील ट्रॉमा केअर सेंटरच्या इमारतीमधील कोविड केअर सेंटरचे उद्घाटन आज सायंकाळी सहा वाजता सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचे हस्ते होणार होते. मात्र, त्याचपूर्वी सर्जिकल स्ट्राईक करत भाजपच्या वतीने पंचायत समितीच्या सभापती पुष्पाताई रेडके यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. त्यामुळे इंदापूर तालुक्यामध्ये भाजप व राष्ट्रवादीमध्ये कलगीतुरा रंगण्याची चिन्हे आहेत. 

माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या माध्यमातून ट्रॉमा केअर सेंटर इमारत मंजूर झाल्याचा व भिगवण येथील कोविड केअर सेंटर सुरू करण्याच्या पंचायत समितीच्या मागणीस यश आल्याचा दावा करत कोविड केअर सेंटरचे उद्घाटन पंचायत समितीच्या माध्यमातून केले. उद्घाटन समारंभासाठी पंचायत समितीच्या सभापती पुष्पाताई रेडके, उपसभापती संजय देहाडे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक वणवे, कर्मयोगी साखर कारखान्याचे संचालक यशवंत वाघ, इंदापूर अर्बन बॅंकेचे संचालक अशोक शिंदे, माजी सरपंच पराग जाधव, तक्रारवाडीच्या सरपंच शोभाताई वाघ, डिकसळचे सरपंच सूर्यकांत सवाणे, मदनवाडीचे उपसरपंच तेजस देवकाते, ग्रामपंचायत सदस्य तुषार क्षीरसागर, रोटरीचे अध्यक्ष संपत बंडगर, सुनील काळे, सतीश काळे, राजेंद्र जमदाडे, विकास वाघ, दिनेश मारणे, माउली मारकड, गणेश वायदंडे, हनुमंत काजळे, विश्वास देवकाते, युवराज काळंगे, तालुका वैदयकिय अधिकारी सुरेखा पोळ, गटविकास अधिकारी विजयकुमार परिट आदी उपस्थित उपस्थित होते.

याबाबत इंदापूर पंचायत समितीच्या सभापती पुष्पाताई रेडके म्हणाल्या की, भिगवण परिसरामध्ये वाढती कोरोना रुग्नांची संख्या विचारात घेऊन भिगवण येथील माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या प्रयत्नातून मंजूर करण्यात आलेल्या ट्रॉमा केअर सेंटरच्या इमारतीमध्ये कोविड केअर सेंटर उभारण्यात यावे, अशी मागणी पंचायत समितीच्या माध्यमातून केली होती. कोविड केअर सेंटरमुळे या भागातील रुग्णांची सोय होईल. इंदापूर अर्बन बॅंकेचे संचालक अशोक शिंदे म्हणाले की, सध्या पंचायत समितीच्या मागणीनुसार कोविड सेंटर होत आहे त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

राष्ट्रवादीचे उत्तर : कोरोनात राजकारण नको
याबाबत राष्ट्रवादीचे भिगवण- शेटफळगढे जिल्हा परिषद गटाचे सदस्य हनुमंत बंडगर म्हणाले की, राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांचे मार्गदर्शनाखाली बैठक घेऊन भिगवण येथील कोविड केअर सेंटर उभारण्यासाठी तयारी केली होती. प्रॉटोकोलप्रमाणे पंचायत समिती पदाधिकाऱ्यांची नावेही पत्रिकेमध्ये टाकण्यात आली होती. राष्ट्रवादीने तयारी केलेल्या कार्यक्रमाचे विरोधकांनी उद्घाटन करणे योग्य नाही. सध्या कोरोनाचा स्थिती अत्यंत गंभीर आहे, अशा परिस्थिती विरोधकांनी राजकारण करु नये. भिगवण कोविड केअर सेंटरचे सायंकाळी सहा वाजता अधिकृत उद्घाटन होईल.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com