महाराष्ट्र पोलीस अपराध्यांना वठणीवर आणायला समर्थ, पण..; छेडछाडीच्या घटनांनंतर चित्रा वाघ सरकारवर खवळल्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

BJP Leader Chitra Wagh

पुण्यात महिला, मुलींवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये सातत्यानं वाढ होत आहे.

Chitra Wagh : महाराष्ट्र पोलीस अपराध्यांना वठणीवर आणायला समर्थ, पण..

पुण्यात (Pune Crime) महिला, तसंच मुलींवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये सातत्यानं वाढ होत आहे. दरम्यान, बंडगार्डन परिसरात (Bund Garden Pune) मुलींसोबत गैरप्रकारच्या एक नव्हे, तर तीन घटना घडल्या आहेत. त्यामुळं संतापाची लाट उसळलीय. पबमध्ये इव्हेंट मॅनेजमेंट करणाऱ्या ग्रुपमधील तरुणीची एका टोळक्यानं छेड काढली. तर, याच परिसरातील एका हॉटेलच्या पार्किंगमध्ये 19 वर्षीय तरुणीसोबत अश्लील कृत्य केल्याची घटना घडलीय. याशिवाय, पीएमपीएमएलच्या वाहकानं 17 वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आलाय. या घटनांमुळं महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून या प्रकरणानंतर भाजप नेत्या चित्रा वाघ (BJP Leader Chitra Wagh) यांनी संतप्त प्रतिक्रिया दिलीय.

चित्रा वाघ यांनी ट्विटव्दारे ठाकरे सरकारवर (Thackeray Government) निशाणा साधत सत्ताधाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलंय. त्या म्हणाल्या, पुण्यातील बंडगार्डन परिसरात मुलींसोबत गैरप्रकारच्या तीन घटना घडल्या आहेत. हे खूपच चिंताजनक आहे. महाराष्ट्र पोलीस सर्व प्रकारच्या अपराध्यांना वठणीवर आणायला समर्थ आहे; पण त्यांना सत्ताधाऱ्यांनी खंडणी वसुलीतून मोकळीक दिली तर ना? असा सवाल त्यांनी महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi Government) केलाय.

हेही वाचा: पराभवानंतर अखिलेश यादव ॲक्शन मोडमध्ये; चार नेत्यांची पक्षातून हकालपट्टी

बंडगार्डन परिसरात मुलींसोबत गैरप्रकारच्या घटना

बंडगार्डन परिसरातील पबमध्ये इव्हेंट मॅनेजमेंट करणाऱ्या ग्रुपमधील मुलीची एका टोळक्यानं मध्यरात्री छेड काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. यावेळी झालेल्या वादात टोळक्यानं तिच्या दोन मित्रांना बेदम मारहाण देखील केलीय. 20 वर्षीय तरुणाच्या तक्रारीनंतर बंडगार्डन पोलिसांनी शुभम शिंदे आणि त्याच्या दोन साथीदारांवर भादवी कलम 395, 397, 509, मुंबई पोलीस अॅक्ट कलम 37 (1), (3)सह 135 नुसार गुन्हा दाखल केलाय. तर, बंडगार्डन पोलीस स्टेशनच्या हद्दीतील 2BHK हॉटेलच्या पार्किंगमध्ये एका 19 वर्षीय तरुणीसोबत पहाटे अडीच वाजता अश्लील कृत्य करण्यात आलं. इतकंच नाही तर या तरुणीचा हात मुरगळून तिला मारहाण करण्याचाही प्रयत्न झाला. 13 मार्च रोजी पहाटे अडीचच्या सुमारास हा प्रकार घडला. याप्रकरणी एका 19 वर्षीय तरुणीनं तक्रार दाखल केली. त्यानुसार आरोपी ओहनसिंह सहानी याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. तसंच एमपीएमएलच्या स्वारगेट ते विश्रांतवाडी या मार्गावर प्रवास करणाऱ्या एका 17 वर्षीय अल्पवयीन तरुणीचा वाहकानं विनयभंग केला असून या प्रकरणी बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. प्रशांत किसन गोडगे असं गुन्हा दाखल करण्यात आलेल्या वाहकाचं नाव आहे.

Web Title: Bjp Leader Chitra Wagh Angry Reaction Regarding Crime In Pune Bund Garden

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..