Lockdown : चंद्रकांत पाटील चक्क करतायत 'बारामती'चं कौतुक!

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 23 April 2020

आघाडीच्या नेत्यांची स्थिती अवस्था 'नाचता येईना अंगण वाकडे' अशी आहे, असा टोलाही पाटील यांनी लगावला.​

पुणे : पुण्यात कोरोनाला थोपविण्यासाठी 'बारामती पॅटर्न' राबविण्याबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे आग्रही आहेत.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आणि तो अमलात आणण्याबाबत पाटील यांनी बुधवारी (ता.२२) महापालिका आणि पोलिस प्रशासनासोबत छोट्या घरांतील नागरिकांना विशेषत: ज्येष्ठ नागरिकांना मंगल कार्यालय, हॉटेल, अन्य ठिकाणी राहण्याची सोय करता येईल, याचीही चाचपणी पाटील यांनी केली.

- Coronavirus : दिवसभरात सापडलेल्या नव्या रुग्णांच्या संख्येने पुणेकरांची वाढली धाकधूक!

कोरोनाचा संसर्ग, रुग्ण, त्यांच्यावरील उपचाराची आरोग्य व्यवस्था, नियोजन या पार्श्‍वभूमीवर पाटील यांनी महापालिका आयुक्त शेखर गायकवाड आणि पोलिस आयुक्त के. वेंकटेशम यांची भेट घेऊन चर्चा केली. महापौर मुरलीधर मोहोळ, सभागृहनेते धीरज घाटे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते. 

- कधी सुधारणार पुणेकर?; विश्रांतवाडीत तब्बल एवढी वाहने पोलिसांनी केली जप्त
पुण्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यावर वेगवेगळे उपाय केले जात आहे. तरीही दिवसागणिक 50 ते 60 पेक्षा अधिक रुग्ण नवे रुग्ण आढळून येत आहेत. या पार्श्‍वभूमीवर लोकांना घराबाहेर येऊ न देता, त्यांना घरपोच जीवनावश्‍यक वस्तू पुरविणारा बारामती पॅटर्न उपयुक्त ठरेल, असे पाटील यांनी सांगितले. 

- मुख्यमंत्र्यांविरोधात पोस्ट करणे एकाला पडले महागात

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विधान परिषदेतील नियुक्तीवरून महाविकास आघाडीचे नेते राजकारण करीत आहेत. या आघाडीच्या नेत्यांची आकलन क्षमी कमी आहे. त्यांच्यातच ताळमेळ नाही आणि ते दुसऱ्यांना दोषी ठरवतात. आघाडीच्या नेत्यांची स्थिती अवस्था 'नाचता येईना अंगण वाकडे' अशी आहे, असा टोलाही पाटील यांनी लगावला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP state president Chandrakant Patil demand for implementing a Baramati pattern in Pune