
जुन्या मुंबई पुणे महामार्गावर खोपोलीजवळ बोरघाटात भरधाव वेगातील मालवाहतूक ट्रकने पाच वाहनांना धडक दिल्याने भीषण अपघात झाला असून यात बापलेकीचा मृत्यू झाला तर 12 जण जखमी झाले. जखमींपैकी 4 जणांना गंभीर दुखापती झाल्या असून त्यांना पुढील उपचासाठी पनवेल, खोपोली, लोणावळा येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा अपघात रविवारी रात्री अमृताजंन पुलाजवळ झाला.