Video : मानलं बुवा! या पठ्ठ्याचे चक्क 12 हजार मोबाईल नंबर आहेत पाठ

 सागर आव्हाड 
बुधवार, 18 सप्टेंबर 2019

आजकाल 1000 पेक्षा जास्त मोबाईल क्रमांक मोबाईलमध्ये सुध्दा जतन करता येत नाही पण, पुण्यातील एका अवलियाने चक्क 10 ते 12 हजार मोबाईल क्रमांक पाठ केले आहेत.

पुणे : रोजच्या धकाधकीच्या जीवनात माणून मोबाईलवर विंसबून राहत आहे. पुर्वी मोबाईल क्रमांक तोंडपाठ असायचे आता मात्र, मोबाईल नंबर फक्त मोबाईलमध्येच जतन होत असल्याने कोणीही पाठ करत नाही. आजकाल 1000 पेक्षा जास्त मोबाईल क्रमांक मोबाईलमध्ये सुध्दा जतन करता येत नाही पण, पुण्यातील एका अवलियाने चक्क 10 ते 12 हजार मोबाईल क्रमांक पाठ केले आहेत.

साधे पाढे पाठ केले माणसाच्या लक्षात राहात नाहीत मात्र या अवलीयाच्या डोक्यात चक्क 12 हजार मोबाईल नंबर तेही सगळ्या क्षेत्रातील व्यक्तींचे तोंडपाठ आहेत.  योगेश धुमाळ असे या अवलियाचे नाव आहे. त्याला सर्व नेते, सामाजिक कार्यकर्ते यांचे मोबाईल नंबर तोंडपाठ आहेत. योगेशला जर तुम्ही एखादा मोबाईल नंबर सांगितला तर, तो लगेच त्याच्या लक्षात राहतो. यावर कोणी विश्वास ठेवणार नाही मात्र हे खरं
आहे.
नजरेला नजर भिडताच झाला राडा; शाहरुखने दिली तक्रार

खात्री करण्यासाठी योगेशची तपासणी केली. काही युवकाला बोलावून त्यांच्या मोबाईलमध्ये असलेले नाव आणि त्यांचे मोबाईल नंबर विचारले. सर्व नंबर खरे निघाले. त्यांनतर त्याला अनेकांनी नंबर विचारले ते नंबर ही त्याने अचूक सांगितले. योगेशच्या स्मरणशक्तीचे कौतुक करत अनेक कार्यक्रमांमध्ये सन्मानित करण्यात आले आहे.
पुण्यात मोबाईल फेकून मारल्याने फुटले महिलेचे डोकं 

कोण आहे हा योगेश धुमाळ?
योगेश हा पुण्यात हमाली करतो. रोज योग व व्यायाम करत असल्यामुळे त्याची बुद्धी तल्लख आहे. योगेश धुमाळ याला सर्व पक्षाचे नेते मास्टर माइंड नावाने ओळखतात 

पुणे : लोणीकंद तलावात आढळले दोन मृतदेह


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A boy by heart 12 thousand phone numbers in pune