
कौंटुंबिक परिस्थितीवर मात करत स्पर्धा परीक्षेत यश मिळवून गोळेगाव तालुका जुन्नर येथील भावा-बहिणीने आई व वडिलांच्या कष्टाचे चीज करून दाखविले आहे. त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
जुन्नर - कौंटुंबिक परिस्थितीवर मात करत स्पर्धा परीक्षेत यश मिळवून गोळेगाव तालुका जुन्नर येथील भावा-बहिणीने आई व वडिलांच्या कष्टाचे चीज करून दाखविले आहे. त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत सतिश विठ्ठल बेळे याची आसाम रायफल्स मध्ये तर बहीण छाया हिची केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ) मध्ये निवड झाली आहे. सतीश बारावी तर छाया बी.कॉम झाली आहे.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
घरी एकत्र कुटुंबातील फक्त अर्धा एकर शेती असल्याने वडील विठ्ठल मारुती बेळे यांनी हमालीकाम तर आई रेवडीबाई शेतात मोलमजुरी करत प्रपंचाचा गाडा ओढत आहेत. घरी वृद्ध आई,पत्नी व दोन मुले या सर्वांची जबाबदारी खांद्यावर असल्याने कुटुंबाचा चरितार्थ चालवण्यासाठी तसेच मुलांचे शिक्षण आईचा औषधोपचार यासाठी वडील विठ्ठल जुन्नर येथे हमाली काम करतात.
पुण्यात कचरा प्रक्रिया प्रकल्पाला भीषण आग; मशिनरी जळून खाक
स्वतःच्या तीन चाकी सायकलॉवरून व्यापाऱ्यांचा माल घेऊन ग्राहकांपर्यंत पोहोच करण्याचे काम विठ्ठल करतात. तर कुटुंबाचा खर्च भागविण्याची त्यांची धडपड पाहून पतीच्या खांद्याला खांदा लावत रेवडीबाई देखील शेतमजुरी करत आहेत. आपल्या भविष्यासाठी आईवडिलांची चाललेली धडपड पाहून दोघा बहीण भावाने शिकून मोठ होण्याच स्वप्न उराशी बाळगल होतं. ते आता साकार झाल्याची भावना आपल्या निवडीनंतर त्यांनी व्यक्त केली आहे.
पुण्यात पुन्हा होणार एल्गार परिषद
सतीश व छाया यांनी केंद्र व राज्य सरकारच्या विविध स्पर्धा परीक्षांना सामोरे जाण्याचा निर्णय घेतला.आसाम रायफल्स व सीआरसीएफच्या स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत असणाऱ्या परीक्षा २०१६ पासून देण्यास सुरुवात केली. 2018 मध्ये दिलेल्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आणि विशेष म्हणजे दोघे बहीण भाऊ परीक्षेत चांगल्या गुणांनी यशस्वी झाले.
पुणे पोलिसांची सर्वात मोठी कारवाई: तब्बल 120 कोटी रुपयांचा गुटखा, तंबाखु माल जप्त
दोघांच्या यशाबद्दल लेण्याद्री देवस्थानचे अध्यक्ष कैलास लोखंडे,सचिव जितेंद्र बिडवई,जुन्नर बिल्डर्स असोसिएशनचे मुकेश ताजणे,अश्वमेघ मंचचे उपाध्यक्ष संदीप ताजणे तसेच गोळेगावचे ग्रामस्थ व परिसरातील नागरिकांनी त्यांचे अभिनंदन केले.
Edited By - Prashant Patil