अरेरे! जमीन घेण्यासाठी साठवलेले ७ लाख रुपये आगीत जळून खाक!

समाधान काटे
Thursday, 19 March 2020

अग्निशामक दलाच्या पंधरा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. एक तासाच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. सदरील आगीत ५५ कुटुंबाची घरे जळून खाक झाली असल्याची माहिती पंचनाम्यात समोर आली आहे.

गोखलेनगर : धुणी-भांडी करून साठवलेल्या पैशातून गावाकडे चुलत सासूची शेती विकत घ्यायची होती. म्हणून बुधवारी रात्री सात लाख मोजून कपाटात ठेवले होते. मात्र मध्यरात्रीच आगीने या पैशांवर झडप घातली आणि पै-पै कमावलेले पैसे जळून खाक झाले. 

आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

जुनी वडारवाडी येथे पांडवनगर पोलीस चौकीच्या शेजारी बसवेश्वर, कल्याणेश्वर मठाच्या बाजूला बुधवारी (ता.१८) मध्यरात्री अचानक आग लागली. गॅस सिलेंडरचे स्फोट होऊ लागले. आग मात्र वाढतच होती. अनेक घरे जळून खाक होत असताना नागरिक आपला जीव वाचवण्यासाठी फक्त अंगावरच्या कपड्यासह घराबाहेर पडत होते. यामध्ये निलम वेल्लाप्पा मांजरेकर या देखील आपला व मुलांचा जीव वाचवण्यासाठी
दोन मुली व एका मुलाला घेऊन घराबाहेर पडल्या. मात्र, घरामध्ये नऊ तोळे सोने व सात लाख रूपये जळून जात होतो.

- Nirbhaya Case : अखेर निर्भयाच्या दोषींना उद्या फाशी

मांजरेकर यांनी शेजारीपाजारी, नातेवाईक, कामच्या ठिकाणाहून हातउसने पैसे घेऊन आळचंडी (ता. बागेवाडी, जि. विजापूर) येथे गावाकडे शेती घेण्यासाठी रोख रक्कम जमा केली होती. अचानक सासू मयत झाल्यामुळे ती रोख रक्कम घरातच ठेवलेली होती. गुरूवारी ती रक्कम देण्यासाठी जायचे होते, म्हणून बुधवारी रात्री १० वा मोजून कपाटात ठेवले होते.

- स्वतःची आई ICU मध्ये तरी आरोग्यमंत्री झटतायत महाराष्ट्रासाठी...

मात्र, मध्यरात्री अचानक आग लागल्याने सर्व पैसे, घरदार, संसारोपयोगी समान, किराणा माल, इलेक्ट्रॉनिक वस्तू, कपडे, नऊ तोळ्याचे दागिने जळाले आहे. यातील काही रक्कम कर्जाने घेतली होती. गावाकडे शेती घेण्याचे स्वप्न एका रात्रीत आगीत पैसे घेल्याने भंग पावले.या घटनेची हळहळ नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे.

- Coronavirus : कोरोनाची लस शोधण्यात संशोधकांना यश; चाचणीत दिसले सकारात्मक परिणाम!

अग्निशामक दलाच्या पंधरा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. एक तासाच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. सदरील आगीत ५५ कुटुंबाची घरे जळून खाक झाली असल्याची माहिती पंचनाम्यात समोर आली आहे. संत रामदास स्वामी शाळेत काही कुटुंबाना हलवण्यात आले आहे. सामाजिक संस्थांकडून या जळितग्रस्तांच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: for buying cropland Seven lakh rupees burned in fire at pune