
'जेईई' ही भारतातील आय.आय.टी, एन.आय.टी, आय.आय.आय.टी. आणि गव्हर्मेंट फंडेड इन्स्टिट्यूट अशा प्रख्यात महाविद्यालयांमध्ये अभियांत्रिकी शिक्षणाचे प्रवेशद्वार आहे. जे विद्यार्थी आय.आय.टी, एन.आय.टी, आय.आय.आय.टी. आणि काही प्रायव्हेट टॉप कॉलेजेसला जाऊ इच्छितात ते विद्यार्थी जेईईची तयारी खूप मन लावून करतात. तयारीसाठी विद्यार्थी काेचिंग क्लासेसची निवड करतात.
विद्यार्थी मित्रांनो तुमच्या मध्ये जर अभ्यास करण्याची क्षमता आहे, अभ्यास करण्याची तयारी आहे, 'आयआयटी'ला जाण्याची तीव्र इच्छा आहे, प्रचंड मेहनत करण्याची तयारी आहे, तर तुम्ही नक्की जेईई क्रॅक करू शकाल. ते तुम्ही कसं करू शकाल, याबद्दल सांगताहेत करिअर समुपदेशक रीना भुतडा.
तुम्ही चांगल्या रँक झोनमध्ये येऊ इच्छिता तर मेंटर (शिक्षकांनी) नी दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करा. दररोज सहा ते आठ तास स्वयं-अध्ययन होणे महत्त्वाचे असते आणि तेही दररोज. एक दिवस केले आणि दुसऱ्या दिवशी नाही, तर असं अजिबात व्हायला नको. विद्यार्थी मित्रांनो टार्गेट सेट करा आणि ते मिळवण्यासाठी प्रचंड मेहनत घेणे, स्वतःचे काही स्पेशल स्किल्स डेव्हलप करणे महत्त्वाचे ठरते. आपल्या या आधीच्या लेखातसुद्धा म्हटलेलं आहे की 'प्रॅक्टिस' खूप महत्त्वाची आहे.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
अकरावी आणि बारावीचा पूर्ण बेसिक अभ्यास झाल्यानंतर 'जेईई'चे आधीचे झालेले जास्तीत जास्त पेपर सोडविणे महत्वाचे असते. पेपरची प्रॅक्टिस केल्यामुळे 'स्पीड अॅक्युरॅसी आणि टाईम' चा आत्मविश्वास येतो. म्हणजेच खूप सारी प्रॅक्टिस आणि पेपर सोडविणे गरजेचे आहे. विविध प्रकारची गणिते जास्तीत जास्त सोडविणे अति महत्त्वाचे.
आता अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे 'मोबाइल व सोशल मीडिया' पासून लांब राहणे. सोशल मीडियावर घालविलेल्या वेळेवर बंधन घालने खूप गरजेचे आहे. फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटरचा वापर कसा कमीत कमी करता येईल किंवा टाळता येईल, हेसुद्धा पाहणे तितकेच जरुरी ठरेल.
जेईई परीक्षेसाठी मूळ संकल्पना स्पष्ट असणे खूप महत्त्वाचे असते. 'एनसीईआरटी'च्या पुस्तकांमधून मूळ संकल्पना स्पष्ट करून पूर्ण अभ्यास करणे, तसेच सगळे थेरम लिहून बघणे व त्या थेरमचा वास्तविक जीवनाशी संबंध जोडल्यास लक्षात ठेवायला त्याचा उपयोग होतो. त्याचबरोबर प्रत्येक थेरम आणि फार्मूलाचे 'का आणि कसं' जाणणे, हे ही अत्यंत महत्त्वाचे असते. जर काही संकल्पना स्पष्ट नसतील, तर काही व्हिडीओ पाहून त्या संकल्पना स्पष्ट करून घेणे, मदतीचे ठरते.
हे सगळे करतांना विद्यार्थी मित्रांनो तुम्ही मोटिवेटेड आणि पॉझिटिव्ह ही राहणे तितकेच महत्त्वाचे आहे. या दोन वर्षातील आपला अमूल्य वेळ मुळीच वाया घालवू नये, तसेच स्वतःचे इनर मोटिवेशन आणि पॅशन कायम उच्च ठेवणे तितकेच महत्त्वाचे आहे. तुम्हाला 'जेईई'च का करायचे आहे, त्याचे खास कारण लिहिता येणे, 'पॉझिटिव्ह' राहण्यासाठी खूप मदत करते, तेच खास कारण तुम्हाला नेहमी वर पुश करेल आणि ते काम तुम्ही नक्की पूर्ण करू शकाल आणि त्यात नक्कीच यश प्राप्ती होते.
जेईईही परीक्षा अत्यंत स्पर्धात्मक आहे, त्यामुळे आळसाला येथे मुळीच थारा नाही व पटकन कामाला लागणे अपेक्षित असते. पॉझिटिव्ह राहण्यासाठी 'पॉझिटिव्ह अंबिएन्स' हि खूप महत्वाचा असतो. नीटनेटके रूम, चांगले कोट्स, यशस्वी लोकांसोबत केलेला संवाद, प्रसन्न वातावरणात अभ्यासाची सुरुवात, हे तुम्हाला नक्कीच मदत करू शकतात. फक्त कारण देण्यापेक्षा, कार्य करीत राहणे गरजेचे आहे. ह्या परीक्षेतील स्पर्धा फक्त आपल्या वर्गातील, शहरातील, राज्यातील विद्यार्थ्यांसोबत नसून, ही स्पर्धा राष्ट्रीय पातळीवरील आहे, याचे भान तयारीच्या पहिल्या दिवसापासून ठेवणे गरजेचे आहे.
काहीतरी खूप छान करून दाखवण्याची जिद्द असेल, मेहनत घेण्याची तयारी असेल, तर जेईईमध्ये यश संपादन करणे नक्कीच शक्य आहे, यात शंका नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.