...अन्‌ उलगडले कुंचल्याचे ‘राज’

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 फेब्रुवारी 2020

‘ऑफर’ अन्‌ हशा
राज यांच्या उपस्थितीत व्यंग्यचित्रकार संजय मिस्त्री यांनी मनोगत मांडताना कलेचे महत्त्व पटवून दिले. त्यांचे भाषण ऐकून राज यांनी मिस्त्री यांना मनसेत येण्याची जाहीर ‘ऑफर’ दिली. त्या वेळी सभागृहात एकच हशा पिकला.

पुणे - ‘कुंचल्याच्या दुनियेत आलो ते शिक्षण सोडून. म्हणून माझ्याकडं तशी शैक्षणिक डिग्री नाही. ती आहे की नाही, हेही कुणी कधी विचारलंही नाही,’’ अशी कबुली देत शिक्षणापेक्षा आपण व्यंग्यचित्रांच्या दुनियेत ‘राज्य’ करीत असल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी सांगितले. या कार्यक्रमात एका व्यंग्यचित्रकाराचे भाषण ऐकून राज यांनी त्यांना ‘मनसे’त ‘ऑफर’ देत हशा पिकवला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

झील इन्स्टिट्यूट आणि कार्टुनिस्ट कंबाईन यांच्यातर्फे शालेय विद्यार्थ्यांसाठी आयोजिलेल्या व्यंग्यचित्र कार्यशाळेचे उद्‌घाटन राज यांच्या हस्ते झाले. त्या वेळी त्यांनी विद्यार्थ्यांसह व्यंग्यचित्रकारांना ‘धडे’ दिले. ज्येष्ठ व्यंग्यचित्रकार शि. द. फडणीस, चारुहास पंडित, जयेश काटकर आदी उपस्थित होते.

आजपासून तुझी उलटी गिनती सुरू कर, तुला अन् तुझ्या मुलाला मारुन टाकीन

आपल्या आवडीच्या क्षेत्रातील कार्यक्रमाला हजेरी लावलेल्या राज यांनी राजकारणापेक्षा कलेबाबत आपली भूमिका मांडली आणि राजकीय सभांप्रमाणे दीड मिनिटांच्या भाषणात हा कार्यक्रमही जिंकला. 

सासवड रोड रेल्वेस्थानक बुधवारपासून नव्या जागेत: आता 'येथून' धावणार रेल्वे

विशेष म्हणजे, राज येणार असल्याने विद्यार्थ्यांसह पालकांनी प्रचंड गर्दी केली होती. ही गर्दी पाहून त्यांनी राजकीय विधानाला बाजूला सारत विद्यार्थ्यांचा उत्साह पाहून त्यांना प्रोत्साहन दिले.

पुण्यात वृद्ध महिलेच्या अंगावरुन रिक्षा घालत रिक्षाचालकाने लुटले 25 हजार रुपये

राज म्हणाले, ‘‘चित्रकेलासारखा विषय सरकार ‘ऑप्शनल’ला ठेवते, तेव्हा संस्थांनी पुढाकार घेऊन या विषयाला प्रोत्साहन देण्याची गरज आहे. कला अंगीकरणे, ती जोपासणे आणि वाढविण्यासाठी शैक्षणिक डिग्रीची आवश्‍यकता नाही. या क्षेत्रात येण्यासाठीच मी जे. जे. आर्ट ऑफ स्कूलमध्ये प्रवेश घेतला. त्यानंतर माझ्याकडे कोणती डिग्री आहे, हे महत्त्वाचे ठरले नाही.’’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: cartoon workshop by jhil institute and cartoonist combine