CBSEच्या परीक्षेसाठी 7 सूचना अत्यंत महत्वाच्या; पेनासोबत हवे सॅनिटायझर

cbse exam 2020 dates guidelines for students marathi
cbse exam 2020 dates guidelines for students marathi

पुणे Pune News : कोरोना व्हायरसमुळे जगभरात आणि भारतात उद्भवलेल्या अभूतपूर्व परिस्थितीचा परिणाम शालेय परिक्षांवर थेट झाला आहे. त्याचे पडसाद आज घोषित झालेल्या सीबीएसईच्या परीक्षेवरही उमटले आहेत. या परीक्षा जुलै महिन्यात होणार असून, त्यावेळी विद्यार्थ्यांना पेनबरोबर सॅनिटायझरची बाटली देखील बरोबर ठेवावी लागणार आहे.

कोरोनाची भीती प्रत्येकांच्या मनात आहेच. त्यामुळे परीक्षेचे नियोजन करताना, त्याचा प्रसार रोखण्याची खबरदारी घेण्यात येत आहे. सीबीएसईने परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करताना विद्यार्थी आणि पालकांसाठी विशेष सूचना देखील जारी केल्या आहेत. त्यात शैक्षणिक सूचना कमी आणि खबरदारी घेण्याच्या सूचना अधिक आहेत. त्यानुसार परीक्षेसाठी पेन जसा आवश्यक, तसेच प्रवेशपत्र बरोबर आणणे गरजेचे आहे, तशीच सॅनिटायझरची बाटली बरोबर ठेवणे देखील आता बंधनकारक झाले आहे. सीबीएसईने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार दहावी, बारावीच्या परीक्षा 1 ते 15 जुलै दरम्यान होईल. परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्या सव्वादहा वाजेपूर्वी यायचे आहे. त्यांना सव्वा दहा वाजता प्रश्नपत्रिका हाती मिळेल. विद्यार्थी साडे दहा वाजता पेपर सोडविण्यास सुरवात करेल, असे मंडळाने म्हटले आहे. यासह काय आहेत सूचना, हे जाणून घेऊयात.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

या सूचना महत्त्वाच्या

  • सर्व विद्यार्थ्यांनी पारदर्शक बाटलीतून सॅनिटायझर आणले पाहिजे
  • विद्यार्थ्यांनी नाक, चेहरा झाकला पाहिजे. विशेषतः नाक मास्कने किंवा कापडाने झाकले पाहिजे
  • सर्व विद्यार्थी शारीरिक अंतराचे नियम पाळतील
  • कोव्हीड19 चा प्रसार रोखण्यासाठी घ्यावयाच्या काळजीबद्दल पालक त्यांच्या पाल्यांना मार्गदर्शन करतील
  • आपला पाल्य आजारी पडणार नाही, याची काळजी पालक घेतील
  • परीक्षा केंद्रावर दिल्या गेलेल्या सूचनांचे काटेकोर पालन विद्यार्थी करतील
  • परीक्षा कार्डवर दिल्या गेलेल्या सूचनांचे पालन विद्यार्थी करतील
     

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com